लोकमत न्यूज नेटवर्क । नवी दिल्ली
कोरोना काळात म्हणजेच मार्च २०२० ते मार्च २०२२ या दरम्यान खासगी क्षेत्रातील टॉप १५ कंपन्यांतील रोजगारात १४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. टॉप १५ सरकारी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची संख्या ८%नी घटली आहे.
येथे सर्वाधिक नोकऱ्या
सर्वाधिक एमकॅप असलेल्या टॉप १० कंपन्यांपैकी ८ कंपन्यांनी २०२१-२२ मध्ये ३ लाखपेक्षा अधिक नोकऱ्या दिल्या. सर्वाधिक नोकऱ्या रिलायन्स, टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी आणि मारुती सुझुकी या कंपन्यांनी दिल्या आहेत.
१५% आहे देशात नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण. आयटी क्षेत्रातील ॲट्रिशन रेट जवळपास २५%
१५ टॉप सरकारी कंपन्यांपैकी केवळ एसबीआय लाईफ इन्शुरन्स आणि आयआरसीटीसी या दोनच कंपन्यांतील कर्मचारी संख्या वाढली आहे.
०३ लाख लोकांना टॉप १० खासगी कंपन्यांत २०२१-२२ मध्ये रोजगार