नवी दिल्ली : NPCIL Various Post Jobs 2021: न्युक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एनपीसीआयएलने नर्स, फार्मासिस्ट टेक्निशियन आणि असिस्टेंटसह विविध 72 पदांसाठी भरती जारी केली असून ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे. 10 वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवार काही पदांसाठी अर्ज करू शकतात, तर काही पदांसाठी, संबंधित ट्रेडमध्ये पदवी किंवा डिप्लोमा प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. या पदांवरील उमेदवारांची निवड भरती परीक्षेच्या आधारे केली जाईल.
भरतीच्या महत्त्वाच्या तारखा...- ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख - 3 डिसेंबर 2021- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 डिसेंबर 2021- अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख- 27 डिसेंबर 2021- भरती परीक्षेची तारीख - अद्याप ठरलेली नाही- प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख - अद्याप ठरलेली नाही
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादापॅरामेडिकल आणि स्टायपेंडरी ट्रेनीसह या विविध पदांसाठी विविध पात्रता मागविण्यात आली आहेत. 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवार काही पदांसाठी अर्ज करू शकतात, तर काही पदांसाठी संबंधित ट्रेडमधील पदवी किंवा डिप्लोमा धारक अर्ज करू शकतात. याविषयी अधिक माहितीसाठी, तुम्ही न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेली अधिसूचना पाहू शकता. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, अर्जदारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे.
असा करू शकता अर्ज...या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांना न्युक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://npcilcareers.co.in ला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला या भरतीची अधिसूचना आणि अर्ज भरण्याची लिंक मिळेल. तुम्हाला अर्ज भरण्याशी संबंधित तपशीलवार माहिती वेबसाइटवर मिळेल. तसेच, फॉर्म भरताना काळजी घ्या, कारण त्यात त्रुटी राहिल्यास तो रद्द होऊ शकतो.