नवी दिल्ली : सरकारी बँकेतनोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB Recruitment 2022) अधिकारी आणि व्यवस्थापक या पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 103 पदांची भरती केली जाणार आहे.
महत्त्वाची तारीखअर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 ऑगस्ट
पदांची माहितीएकूण पदांची संख्या- 103अधिकारी (अग्नि सुरक्षा) : 23 पदेव्यवस्थापक (सुरक्षा) : 80 पदे
शैक्षणिक पात्रताया भरती मोहिमेद्वारे अधिकारी (अग्नि सुरक्षा) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात बीईची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, व्यवस्थापकाच्या पदांसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादाअधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 35 वर्षे दरम्यान असावे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सवलत दिली जाईल.
अर्जाचे शुल्कया पदांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांना 1003 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल आणि SC/ST/PWBD श्रेणीसाठी अर्ज शुल्क रुपये 59 आहे.
निवड प्रक्रियाउमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेत प्रत्येकी 2 गुणांचे 50 प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे आहे आणि कमाल गुण 100 आहेत.