शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
2
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
3
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
4
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
5
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
6
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
7
IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा
8
वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...
9
MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?
10
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
11
"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
12
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
13
भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट
14
"राज ठाकरे कधी रिव्हर्स गिअर घेतील आणि कधी…’’, त्या विधानावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया   
15
सारा अली खानचंं सीक्रेट अफेअर! भाजपा नेत्याच्या मुलाला करतेय डेट? केदारनाथला झाले स्पॉट
16
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
17
प्रियकरासोबत सापडली पत्नी! पती CRPF जवानाचा पारा चढला; रेल्वे स्टेशनवर एकच राडा...
18
IPL 2025मध्येही 'फोडाफोडी'चं राजकारण! पंतला CSKमध्ये आणायला धोनी लावतोय 'फिल्डिंग'?
19
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
20
कवठेमहांकाळात खेला होबे! रोहित पाटलांच्या विरोधात तीन रोहित पाटील; एकाच नावाचे ४ उमेदवार

तरुणांनो, सैन्यातील भरतीसाठी तयारीला लागा; शेकडो जागा भरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 7:32 AM

संयुक्त संरक्षण सेवा लेखी परीक्षा ३ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. या

जुलै २०२४ मध्ये सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमासाठी ३४९ पदांच्या भरतीसाठीची भरती प्रक्रिया सुरू झाली असून, ६ जून २०२३ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. संयुक्त संरक्षण सेवा लेखी परीक्षा ३ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे. यात लष्कर प्रबोधिनीसाठी १०० पदे, नौदल प्रबोधिनीसाठी ३२ पदे, हवाई दल प्रबोधिनीसाठी ३२ पदे, ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी पुरुषांसाठी  १६९ पदे  व ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी महिलांसाठी १६ पदे, अशा एकूण ३४९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.   भारतीय सैन्य दलात बारावीनंतर अधिकारी होण्याची संधी हुकल्यास निराश होण्याची गरज नाही. सैन्यात अधिकारी होण्याची आणखी एक संधी पदवीनंतर संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा होते. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सीडीएस  ही परीक्षा पुरुष व महिला दोन्ही देऊ शकतात. महिलांना लष्करात अधिकारी होण्याची संधी सीडीएस मार्फतच उपलब्ध होते. यासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरून भरावा लागतो. 

परीक्षा ही वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी स्वरूपाची आहे.    भारतीय लष्करी प्रबोधिनी अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनी, नौदल प्रबोधिनी, हवाई दल प्रबोधिनी आदींचा प्राधान्यक्रम द्यावा लागतो. सीडीएस परीक्षेसाठी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – १) इंडियन मिलिट्री अकादमी (भारतीय लष्करी प्रबोधिनी) साठी १९ ते २४ वर्ष २) नवाल अकादमी (नौदल प्रबोधिनी) साठी १९ ते २४ वर्षे, ३) हवाई दल प्रबोधिनीसाठी २० ते २४ वर्षे, ४) ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनी) साठी १९ ते २५ वर्षे.        सीडीएस परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता ही सेवानिहाय वेगळी असून, भारतीय लष्करी प्रबोधिनीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, नौदल प्रबोधिनीसाठी बी.ई /बी.टेक व हवाईदल प्रबोधिनीसाठी भौतिकशास्त्र, गणित विषय घेऊन विज्ञान शाखेची पदवी किंवा अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असते. लेखी परीक्षा, व्यक्तिमत्त्व चाचणी, मुलाखत व वैद्यकीय चाचणी यातून उमेदवारांची निवड होते. 

अशी हाेते नियुक्तीप्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लष्करात लेफ्टनंटपदी निवड होते. लेफ्टनंटनंतर कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर या पदोन्नतीच्या संधी उपलब्ध आहेत. हवाई दलाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची फ्लाइंग ऑफिसर म्हणून नियुक्ती होते. नंतर फ्लाइंग लेफ्टनंट, स्क्वॉट्रन लिडर, विंग कमांडर पदोन्नतीच्या संधी आहेत. नौदलाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सब लेफ्टनंट पदावर निवड होते. त्यानंतर लेफ्टनंट, लेफ्टनंट कमांडर, कमांडर, कॅप्टन या  पदोन्नतीच्या संधी आहेत. तरुणांंना यातून देशसेवा करण्याचे भाग्य मिळते.

प्रा. राजेंद्र चिंचाेले(स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक)

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानjobनोकरी