नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. रेल्वेमध्ये (Railway Recruitment 2021) काही पदांसाठी भरती केली जाणार (Recruitment) आहे. यासाठी लेखी परीक्षेची (written exams) अट नसणार आहे. फक्त मुलाखतीद्वारे (interview) या पदावरील उमेदवार भरले जाणार असून 27 आणि 28 जुलैला वॉक-इन इंटरव्ह्यूद्वारे ही पदं भरली जाणार असल्याची माहिती रेल्वेने काढलेल्या एका प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे. या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा 67700 रुपयांपासून 208700 रुपये दरमहा या दरम्यान वेतन मिळणार आहे. याशिवाय त्याला जोडून मिळणारे इतर भत्ते वेगळे असतील.
27 जुलैला होणार 'या' पदाच्या मुलाखती
27 तारखेपासून विविध पदांसाठीच्या मुलाखतींना सुरुवात होणार असून यामध्ये एनेस्थीशियासाठी 1 जागा, ईएनटीसाठी 1 जागा, जनरल मेडिसिनसाठी 12 जागा, जनरल सर्जरीसाठी 6 जागा, मायक्रोबायोलॉजीसाठी 1 जागा, स्त्रीरोग तज्ज्ञांसाठी 1 जागा अशी पदं आहेत.
28 जुलैला होणार 'या' पदाच्या मुलाखती
पेडियाट्रिक्समध्ये 1 पद आणि रेडियोलॉजीसाठी 2 पदांची भरती होणार आहे. या पदांसाठीच्या मुलाखती 28 जुलै रोजी घेतल्या जाणार आहेत.
शैक्षणिक योग्यता
या पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थांमधून पदवी असणं गरजेचं आहे. तसेच कमीत कमी 3 वर्षांचा अनुभव असणं बंधनकारक असणार आहे. नोटीफिकेशनमध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
वयोमर्यादा
जनरल कॅटेगिरी - 40 वर्षेओबीसी - 43 वर्षेएससी, एसटी - 45 वर्षे
पगार
पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा 67700 रुपयांपासून 208700 रुपये दरमहा या दरम्यान वेतन मिळणार आहे. याशिवाय त्याला जोडून मिळणारे इतर भत्ते वेगळे असतील. https://nr.indianrailways.gov.in/nr/recruitment/1626097034854_SR_Ad-NP_Website-July-2021-converted.pdf या ठिकाणी अधिक माहिती मिळवू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.