नवी दिल्ली : 12वी पास आणि पदवीधर उमेदवारांना रेल्वेत नोकरी (Railway Jobs) मिळण्याची सुवर्णसंधी आहे. पश्चिम रेल्वेने स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत लेव्हल 2, 3, 4 आणि 5 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrcwr.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या भरती अधिसूचनेनुसार (Western Railway Recruitment 2022), ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर आहे. 05 सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत एकूण 21 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये लेव्हल 2, 3 च्या पदांवर 16 तर स्तर 4, 5 च्या पदांवर 5 जागा रिक्त आहेत.
रिक्त पदांचे डिटेल्स...लेव्हल – 2 आणि 3वेटलिफ्टिंग (पुरुष) - 02 पॉवरलिफ्टिंग -(पुरुष) - 01 पॉवरलिफ्टिंग (महिला) - 01 कुस्ती (पुरुष) - 01 नेमबाजी (पुरुष किंवा महिला) - 01 कबड्डी (पुरुष आणि महिला) - 03 हॉकी (पुरुष) - 01 जिम्नॅस्टिक (पुरुष) - 02 क्रिकेट (पुरुष) - 02 क्रिकेट (महिला) - 01 पोस्ट बॉल बॅडमिंटन - 01 एकूण 16 रिक्त जागा
लेव्हल – 4 आणि 5 कुस्ती (पुरुष) फ्री स्टाइल – 01 नेमबाजी (महिला आणि पुरुष) – 01 कबड्डी (पुरुष) – 01 हॉकी (पुरुष) – 02 पदे एकूण 05 रिक्त जागा
कोण करू शकतं अर्ज?लेव्हल 4 आणि 5 च्या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार किमान पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर लेव्हल 2 आणि 3 च्या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावेत. दरम्यान, लिपिक कम टायपिस्ट या पदासाठी उमेदवाराला इंग्रजी टायपिंगचा वेग 30 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंगचा वेग 25 शब्द प्रति मिनिट असा असावा.
उमेदवारांची वयोमर्यादा व अर्ज शुल्करेल्वे भरती 2022 साठी पात्र उमेदवारांची वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असली पाहिजे. अर्ज शुल्क हे सामान्य आणि ओबीसी उमेदवारांना 500 रुपये आणि एससी, एसटी, महिला, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना 250 रुपये भरावे लागेल.
जाणून घ्या, किती मिळेल पगार?- लेव्हल 4 पदासाठी 25500-81100 रुपये प्रति महिना- लेव्हल 5 पदासाठी 29200- 92300 रुपये प्रति महिना- लेव्हल 2 पदासाठी 19900-63200 रुपये प्रति महिना- लेव्हल 3 पदासाठी 21700-69100 रुपये प्रति महिना
निवड प्रक्रियाया पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड क्रीडा चाचण्यांमधील कामगिरी, खेळतील कामगिरी, शैक्षणिक पात्रता या आधारे केली जाईल. दरम्यान, या रेल्वे भरतीशी संबंधित महत्त्वाच्या माहितीसाठी पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या भरती अधिसूचना काळजीपूर्वक पाहावी.