ISI Recruitment 2021: इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटनं (Indian Statistical Institute, ISI) विविध पदांसाठी नोकर भरतीसाठीचं नोटिफिकेशन जारी केलं आहे. यानुसार इंजिनिअर आणि इंजिनिअर असिस्टंट यासोबतच इतर पदांच्या भरतीसाठी इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. यासाठी उमेदवारांना आयएसआयचं अधिकृत संकेतस्थळ https://www.isical.ac.in/ येथे भेट द्यावी लागणार आहे. २३ जुलै अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख आहे.
अर्ज दाखल करण्याआधी उमेदवारांनी नोकरीसंबंधीची संपूर्ण माहिती वाचून घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण नोकरीसाठीच्या अर्जामध्ये कोणतीही चूक झाली तर तुमचा अर्ज रद्द केला जाणार आहे.
नोकरीची माहितीइंजिनिअर इलेक्ट्रीकल- २इंजिनिअरिंग असिस्टंट सिव्हील- ३इंजिनिअरिंग असिस्टंट इलेक्ट्रीकल- ३इलेक्ट्रीशिअन- १४ऑपरेटर कम मेकेनिक- ८असिस्टंट लायब्ररी- ६
अर्ज कसा दाखल करावाआयएसआय इंजिनिअरसह इतर पदांवर नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ https://www.isical.ac.in/ येथे भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या होमपेजवर विविध श्रेणींसाठीच्या भरतीच्या लिंकवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर स्क्रीनवर नवं पेज ओपन होईल. रजिस्ट्रेशनसाठीच्या लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक सर्व माहितीची नोंदणी करा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांक व ईमेल आयडीवर यूझर आयडी आणि पासवर्ड मिळेल. त्याचा वापर करुन लॉग इन करा. त्यानंतर अर्ज पत्रकावरील सर्व माहिती भरून त्यासाठीचं अर्जशुल्क भरा आणि त्याची पावती प्रिंट करुन घ्या.
शुल्क किती?नोकरीसाठी अर्ज दाखल करताना शुल्क म्हणून ४०० रुपये भरावे लागणार आहेत. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळवर भेट देऊ शकतात.