मुंबई – मित्रहो, सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक जण नोकरीच्या शोधात धडपड असतो, अशा युवकांसाठी आपल्या भाषेत सोप्प्या आणि सहज शब्दात तुम्हाला कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती आम्ही तुम्हाला देत असतो, २३ डिसेंबर रोजी आम्ही तुम्हाला IDBI बँकेतील नोकरी भरतीसंदर्भात बातमी दिली होती, कोणत्याही लेखी परीक्षेविना फक्त मुलाखतीच्या आधारे बँकेत नोकरभरती सुरू होती.
या नोकरी भरतीसाठी अर्ज करण्याला २४ डिसेंबरपासून सुरूवात झाली आहे, परंतु आज ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे अद्यापही अर्ज भरला नसेल तर त्वरा करा आणि आपला अर्ज आजच भरा, कशाला नोकरीची संधी गमावताय? (IDBI Bank Recruitment 2020) इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) मध्ये अधिकारी बनण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. आयडीबीआयने (IDBI Bank) स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (Specialist Cadre Officer) पदांसाठी भरती काढली आहे.
पदवीधारकांपासून ते इंजिनिअर आणि सीए शिकलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीची माहिती, नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे
पदे :
डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड-डी) - 11 पदे
असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड-सी) - 52 पदे
मॅनेजर (ग्रेड-बी) - 62 पदे
असिस्टंट मॅनेजर (ग्रेड-ए) - 09 पदे
एकूण पदांची संख्या - 134
शिक्षणाची अट
वेगवेगळ्या पदांसाठी आणि विभागांसाठी वेगवेगळी शिक्षणाची अट घालण्यात आली आहे. कोणत्याही विषयातील सामान्य पदवीधारक, बीएससी ऑनर्स, बीकॉम, बीई/बीटेक, एमसीए, मास्टर्स इन कम्युनिकेशन, इकोनॉमिक्स व चार्टर्ड अकाउंटेंट यासाठी अर्ज करू शकणार आहेत. कोणत्या पदासाठी कोणती योग्यता लागेल याची माहिती खाली दिलेल्या नोटिफिकेशनच्या लिंकवर जाऊन क्लिक करा.
अर्ज कसा कराल?
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आयडीबीआय बँकेच्या वेबसाईट idbibank.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात २४ डिसेंबर २०२० पासून झाली आहे. ७ जानेवारी २०२१ म्हणजे आजच याची मुदत संपणार आहे. अर्जासाठीची लिंक पुढे देण्यात आली आहे.
निवड कशी होईल?
या पदांसाठी आलेल्या अर्जांद्वारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. यानंतर त्यांना ग्रुप डिस्कशन / पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
डायरेक्ट लिंक्स
IDBI Bank SCO notification 2020 साठी इथे क्लिक करा...Apply करण्यासाठी २४ डिसेंबरपासून इथे क्लिक करा... IDBI Bank च्या वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा...