Reserve Bank Of India Recruitment 2021 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ग्रेड बी अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ३२२ पदांसाठी ही भरती केली जाईल. उमेदवारांना आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. आजपासून उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहेत. तसंच अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी असेल. एस, एसटी श्रेणीतील उमेदवारांना यासाठी १०० रूपये शुल्क भरावं लागणार आहे. याव्यतिरिक्त खुल्या प्रवर्गातील, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील विद्यार्थ्यांना ८५० रूपये शुल्क भरावं लागेल. तसंच सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अर्ज करायचा असल्यास त्यांच्याकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. अधिक माहितीसाठी या ठिकाणी क्लिक करा.याव्यतिरिक्त इच्छुक उमेदवारांना https://ibpsonline.ibps.in/rbiscsgjan21/ या संकेतस्थळावर जाऊन आपला अकाऊंट रजिस्टर करून फॉर्म भरता येऊ शकतो. ऑफिसर ग्रेड बी (डीआर) जनरल पदांसाठी पदवीधर तरूणांना अर्ज करता येईल. उमेदवारांची निवड सुरूवातीला होणारी परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या धर्तीवर केलं जाणार आहे.
या पदांसाठी भरतीऑफिसर ग्रेड बी (डीआर) जनरल - २७०ऑफिसर इन ग्रेड बी (डीआर) डीयपीआर- २९ऑफिसर इन ग्रेड बी (डीआर) डीएसआयएम- २३