गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं देशात थैमान घातलेलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनही करण्यात आलं. लॉकडाऊनच्या काळात कंपन्या बंद असल्यानं अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. पण कोरोना संकटाच्या काळातही भारतीय रेल्वेमध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी मिळत आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (आरआरसी) पश्चिम रेल्वेमध्ये जुनियर टेक्निकल एसोसिएट(Junior Technical Associate)ची विविध पदांवर भरती काढली आहे. यासाठी rrc-wr.com एक अधिसूचना जारी केली आहे.पदांची माहितीकनिष्ठ तांत्रिक सहकारी (वर्क्स) - 19 पदेकनिष्ठ तांत्रिक सहकारी (विद्युत) - 12 पदेकनिष्ठ तांत्रिक सहकारी (दूरसंचार / एस अँड टी) - 10 पदेएकूण पदांची संख्या - 41अर्ज माहितीया भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्जाची लिंक पुढे दिली जात आहे.ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख - 24 जुलै 2020.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 22 ऑगस्ट 2020अर्ज फी - अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उमेदवारांसाठी 250 रुपये. सामान्य श्रेणीसाठी हे 500 रुपये आहे. पात्र असल्याचे आढळून आल्यानंतर आणि पर्सनॅलिटी/ इंटेलिजेंस टेस्टमध्ये हजेरी लावून फी परत केली जाईल.आवश्यक पात्रतामान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठाशी संबंधित अभियांत्रिकी संस्थेतून 3 वर्षे डिप्लोमा किंवा बीएससी किंवा चार वर्षांची पदवी (बीई/बीटेक) असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 33 (सामान्य), 36 (ओबीसी) आणि 38 (एससी, एसटी) वर्षे ठेवली गेली आहे. 22 जुलै 2020 पर्यंत वय ग्राह्य धरलं जाईल.निवड प्रक्रिया: - पात्र उमेदवारांची निवड व्यक्तिमत्त्व / बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे असेल.
हेही वाचा
चीनला मोठा धक्का; रशियाचा 'एस 400' ब्रह्मास्त्र देण्यास नकार, करार रद्द
भिवंडीतून राष्ट्रवादी पक्षाने धाडली व्यंकय्या नायडूंना दहा हजार पत्रे
अकरावी प्रवेशावेळी प्रमाणपत्रांसाठी ६ महिने मुदतवाढ द्या - डावखरे
मराठा आरक्षणावरील आजची सुनावणी समाधानकारक: अशोक चव्हाण