Railway Recruitment 2021, RRC Jobs: रेल्वेमध्ये नोकरी (Railway Jobs) करण्याची मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC), ने मुंबईमध्ये फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, कारपेंटर, पेंटर, मेकॅनिक, इलेक्ट्रीशिअन, वायरमन, पाईप फिटर, प्लंबरसह अनेक जागांवर अॅप्रेंटिसशिपसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. पश्चिम रेल्वेने विविध विभागांच्या वर्कशॉपसाठी एकूण 3,591 पदांवर भरती जाहीर केली आहे. (Railway Recruitment Cell, Western Railway has invited online applications for the recruitment of Apprentice for 3591 posts.)
पश्चिम रेल्वे (Western Railway) अॅप्रेंटिसशिप मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ही प्रक्रिया 25 मे पासून सुरु होणार असून शेवटची तारीख ही 24 जून असणार आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी रेल्वेची अधिकृत वेबसाईट rrc-wr.com वर जाऊन अर्ज करायचा आहे. भरतीच्या नोटिफिकेशनची लिंक खाली देण्यात आली आहे.
या पदांवर भरतीफिटर, वेल्डर (G & E), टर्नर, मशीनीस्ट, कारपेंटर, पेंटर (जनरल), मेकॅनिक (DSL आणिमोटर व्हेईकल), प्रोग्रामिंग अँड सिस्टिम एडमिनिस्ट्रेशन असिस्टेंट, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक, रेफ्रिजरेशन अँड एसी मॅकेनिक, वायरमन, पाइप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल) आणि स्टेनोग्राफर (इंग्रजी).
कोण करु शकतात अर्ज...शैक्षणिक योग्यता- उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वीची परीक्षा कमीतकमी ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
तांत्रिक योग्यता...संबंधित ट्रेडमध्ये NCVT किंवा SCVT च्य़ा मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय (ITI) असणे गरजेचे आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची योग्यता पाहण्यासाठी खाली देण्यात आलेल्या नोटिफिकेशन लिंकवर क्लिक करू शकता.
वयाची अटउमेदवारांचे वय 24 जून पर्यंत कमीतकमी 15 वर्षे, जास्तीत जास्त 24 वर्षे असावे. आरक्षणात येणाऱ्या उमेदवारांसाठी वयाची अट शिथिल करण्यात येणार आहे.
निवड प्रक्रियाआरआरसी मुंबई मेरिट यादीनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी दहावी 50 टक्के आणि आयटीआय परीक्षेच्या गुणांवर मेरिट ठरविले जाणार आहे. अर्जदारांची निवड ओरिजनल टेस्टिमोनियल्स आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटच्या आधारे होणार आहे.
अर्ज शुल्कएससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला अर्जदारांना सोडून अन्य उमेदवारांनाा 100 रुपयांचे अर्जशुल्क आकारण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे मुंबई अॅप्रेंटिसशिप भरती 2021 चे नोटिफिकेशनसाठी इथे क्लिक करा...अधिकृत वेबसाईटसाठी इथे क्लिक करा...