नवी दिल्ली: कोरोना संकटाचे प्रमाण बहुतांश प्रमाणात ओसरल्यानंतर आता अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्या मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवताना पाहायला मिळत आहे. यातच आता इलेक्ट्रॉनिक वस्तुंची निर्मिती करणारी दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग (Samsung) पुढील वर्षी भारतात मोठी भरती प्रक्रिया राबवणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सॅमसंग कंपनीच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. पुढील वर्षी कंपनीमध्ये एक हजार अभियंत्यांना संधी देण्यात येणार असून, त्यामध्ये इलेक्टॉनिक, इलेक्ट्रिकल, डेटा मॅनेजमेंट आणि सॉप्टवेअर क्षेत्रातील व्यक्तींची निवड करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
तरुणांना अधिकाधिक संधी देणार
तरुणांना अधिकाधिक संधी देऊन, त्यांच्या कल्पनांचा कंपनीसाठी उपयोग करण्याचे उद्दिष्ट सॅमसंगने ठेवले असून, आगामी काळात कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची भरती होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीकडून पुढील वर्षी एक हजार अभियंत्यांना संधी देण्यात येईल. या अभियंत्यांमध्ये इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, डाटा मॅनेजमेंट आणि स्वफ्टवेअर क्षेत्रातील अभियंत्याचा समावेश असणार आहे. तसेच त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी चांगले वेतन देण्यात येईल, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे.
या संस्थांमधून होणार भरती प्रक्रिया
सॅमसंग कंपनीकडून करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी आयआयएम दिल्ली, कानपूर, मुंबई, मद्रास, गुवाहाटी, खरगपूर, रुरकी आणि अन्य नामांकित शिक्षण संस्थांमधून तरुणांची निवड केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. केवळ हजार अभियंत्यांनाच नव्हे तर आणखी काही अभियंत्यांना देखील संधी दिली जाऊ शकते. कंपनी भारतातील उत्पादन वाढवण्याच्या विचारात आहे. यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज लागणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.