PNB Recruitment 2022, Sarkari Naukri 2022: पंजाब नॅशनल बँकेतनोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. पीएनबीमध्ये ऑफिसर आणि मॅनेजर पदाच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. १०० पेक्षा अधिक जागांवर उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारांना पीएनबीच्या pnbindia.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
इच्छुक उमेदवारांना या पदासाठी ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीनं तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी आवश्यक डिटेल्स आणि निवड प्रक्रिया याबाबत तुम्ही माहिती घेऊ शकता. तसंच पीएनबीच्या संकेतस्थळावरही तुम्हाला यासंदर्भातील माहिती मिळू शकते.
किती पदे?
ऑफिसर (फायर सेफ्टी) - २३ पदे
मॅनेजर (सिक्युरिटी) - ८० पदे
एकूण पदांची संख्या -१०३
कोण करू शकतं अर्ज?
- ऑफिसर (फायर सेफ्टी) साठी नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूरमधून बीई केलेलं असणं अनिवार्य आहे किंवा फायर टेक्नॉलॉजी अथवा सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर्स डिग्री असणं अनिवार्य आहे. याशिवाय एक वर्षाचा अनुभवही आवश्यक आहे.
- मॅनेजर (सिक्युरिटी) - मान्यताप्राप्त कॉलेजमधून कोणत्याही विषयात डिग्री असणं आवश्यक आहे. याशिवाय आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये ५ वर्षांचा अनुभव किंवा पोलीस खात्यात डिप्टी सुप्रिटेंडंट अथवा असिस्टंट कमाडंट म्हणून ५ वर्षांची सेवा असावी.
- या पदांसाठी किमान वयोमर्यादा २१ वर्षे आणि कमला वयोमर्यादा ३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
किती असेल वेतन?
ऑफिसर पदावर नोकरी मिळवणाऱ्या उमेदवाराला ३६०००-१४९०/७-४६४३०-१७४०/२-४९९१०-१९९०/७-६३८४० रूपये आणि मॅनेजर पदासाठी ४८१७०-१७४०/१-४९९१०-१९९०/१०-६९८१० रुपये वेतन दिलं जाईल. उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. अन्य उमेदवारांसाठी १००३ रूपये शुल्क भरावं लागणार आहे. तर अनुसुचित जाती, जमाती, पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना ५९ रुपये शुल्क भरावं लागेल.