एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया(AAI)ने कनिष्ठ सहाय्यक पदावर नियुक्तीसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांवर बीई किंवा बीटेक केलेल्या उमेदवारांबरोबरच 2019मध्ये गेट परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांच्या नियुक्तीसाठी अर्ज ऑनलाईन मागविण्यात आले आहेत. उमेदवार एएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सबमिट करू शकतात.वेबसाइट: www.aai.aeroपदाचे नाव: कनिष्ठ सहाय्यक (अधिकारी)पदांची संख्या: 180वेतनश्रेणी: 40000 - 140000 / - रुपयेशैक्षणिक पात्रताः भारतातील मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेत बीई किंवा बीटेक, गेट 2019मध्ये चांगले गुणवयोमर्यादाः या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 27 वर्षे आहे. वयोमर्यादा 09 सप्टेंबर 2020 पासून ग्राह्य धरली जाईल.अर्ज फी: सर्वसाधारण/ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून 300 रुपये जमा करावे लागतील. एससी/एसटी/ईडब्ल्यूएस/पीडब्ल्यूडी/महिला प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे. नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे फी भरली जाऊ शकते.महत्त्वाच्या तारखाऑनलाईन अर्जाची सुरुवात: 03 ऑगस्त 2020ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीखः 02 सप्टेंबर 2020अर्ज प्रक्रिया: या पदांचे अर्ज ऑनलाईन भरले जातील. इच्छुक उमेदवार संबंधित वेबसाइटवर जाऊन दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
AAIमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, १ लाखांहून जास्त पगार मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 3:10 PM