शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

भारतीय लष्कर, CISF, रेल्वेसह 'या' सरकारी विभागात निघाली बंपर भरती, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 4:35 PM

देशातल्या अनेक राज्यांतील अनेक सरकारी विभागांत भरती निघाल्या आहेत...

कोरोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. व्यवसाय ठप्प असल्यानं अनेक खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिलेला आहे. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली आहे. पण मोदी सरकार कोरोनाच्या काळातही सरकारी नोकरी उपलब्ध करून देत आहे. सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी सरकारनं आनंदाची बातमी दिली आहे, देशातल्या अनेक राज्यांतील अनेक सरकारी विभागांत भरती निघाल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या नोकरींसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करा.SSB  कॉन्स्टेबल पदांसाठी भरती, 27 ऑगस्टपूर्वी अर्ज करा...SSB भरती 2020: एसएसबी कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मोहिमेद्वारे विविध विभागांत एकूण 1522 कॉन्स्टेबल पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज भरावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2020 आहे.SC Building Supervisor Recruitment: सर्वोच्च न्यायालयात इमारत पर्यवेक्षक भरती, लवकरच अर्ज करा, शेवटची तारीख जवळ आली. Supreme Court Building Supervisor Recruitment 2020: भारतीय सर्वोच्च न्यायालयाने पात्र भारतीय नागरिकांकडून इमारत पर्यवेक्षकाच्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार 29 ऑगस्टच्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज पाठवू शकतात.IBPS RRB IX Exam: ऑफिसर स्केल आणि ऑफिस असिस्टंट परीक्षेची तारीख जाहीरIBPS CRP RRB IX Exam 2020 Date Announced: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात आयबीपीएस रिजनल रुरल बँक्स (आरआरबी)मध्ये भरती होणाऱ्या पदांच्या परीक्षेची तारीख 10 ऑगस्ट 2020 जाहीर केली आहे. यासंदर्भात आयबीपीएसने अधिकृत शॉर्ट नोटीस पाठवून ही माहिती दिली आहे. सावधान! भारतीय रेल्वेने 5000 जागांवर भरती काढलेली नाही. बनावट नोटीस व्हायरल Indian Railways Fake Notice: रेल्वे मंत्रालयाने ट्विटरद्वारे रेल्वेत 5000 रिक्त जागांसाठी कोणतीही भरती काढलेली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. रेल्वे मंत्रालयाने अशी कोणतीही जाहिरात काढलेली नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. Cabinet Secretariat Recruitment: कॅबिनेट सचिवालयात 12वी पाससाठी रिक्त जागांवर भरती काढली आहे. जाणून घ्या निवड कशी होईल? Cabinet Secretariat Field Assistant Recruitment 2020: भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयांनी फील्ड असिस्टंटच्या १२ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. ईशान्य राज्यातील रहिवासी असलेले असे उमेदवार या पदांवर भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी आपला अर्ज विहित नमुन्यात भरावा लागेल आणि अर्ज फॉर्म 31 ऑगस्ट रोजी किंवा त्यापूर्वी सचिवालयात पाठवावा लागणार आहे. 

Indian Armyमध्ये भरतीIndian Armyमध्ये 12वी पास सैनिक डी. फार्मा, नर्सिंग सहाय्यक आणि नर्सिंग सहाय्यक पशुवैद्यकीयसाठी पदासांठी अर्ज मागवण्यात आले आहेत. Indian Army Recruitment 2020: कोटा येथील सैन्य भरती कार्यालयानं सैनिक डी फार्मा आणि सैनिक नर्सिंग सहाय्यक आणि नर्सिंग सहाय्यक पशुवैद्यकीय पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार 22-09-2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.Rajasthan Postal Circleने 3262 जीडीएस पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविली आहे.Rajasthan Postal Circle GDS Recruitment 2020: भारतीय टपाल खात्यानं राजस्थान पोस्टल सर्कलच्या जीडीएस पदांसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुन्हा कार्यान्वित केली आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत, परंतु अद्याप कोणत्या तरी कारणास्तव या पदांसाठी अर्ज केलेला नाही, ते आता अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे.SECR Recruitment 2020: दक्षिण-पूर्व रेल्वेने अपरेंटिससाठी मागवले अर्ज, ३० ऑगस्टपूर्वी अर्ज करावा लागणारSECR Recruitment 2020:  दक्षिणपूर्व रेल्वेने अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 30 ऑगस्ट 2020 पूर्वी नमूद केलेल्या स्वरूपात अर्ज करावा. एसईसीआरच्या अ‍ॅप्रेंटिसपदांसाठी अर्ज सुरू झाले आहेत, जर आपण देखील इच्छुक आणि पात्र असाल तर उशीर करू नका आणि वेळेत विहित नमुन्यात फॉर्म भरा. या भरती मोहिमेद्वारे एकूण 432 पदे भरली जाणार आहेत.CISF Constable/ Tradesmen new Exam date: सीआयएसएफ कॉन्स्टेबल/ट्रेडमॅन परीक्षा 6 सप्टेंबरला होणार, नवीन परीक्षेची तारीख जाहीरCISF Constable/ Tradesmen Exam Date Postponed 2020:  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफने पुन्हा एकदा कॉन्स्टेबल/ट्रेडरमॅन भरती 2019च्या परीक्षेची तारीख रद्द केलेली आहे.  सीआयएसएफ कॉन्स्टेबल / ट्रेडमॅन भर्ती 2019 लेखी परीक्षा 6 सप्टेंबर 2020 रोजी होणार होती. यासंदर्भात नोटीस सीआयएसएफच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. NHB Recruitment: राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत तज्ज्ञ अधिकाऱ्यांची भरती, लेखी परीक्षा नाहीNational Housing Bank Specialist Officer Recruitment 2020: नॅशनल हाऊसिंग बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी केली आहे. एनएचबी अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 28 ऑगस्टपूर्वी अर्ज करावा.

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरीPost Officeपोस्ट ऑफिस