कोरोना व्हायरसच्या संकटात अनेकांना नोकरी गमवावी लागली. नोकरी गेल्यामुळे कुटुंबाचा आर्थिक डोलारा कोसळला आहे. पण, आता बेरोजगार तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. ऑईल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड ( ONGC) मध्ये विविध ट्रेड्समध्ये विभागात 4182 पदांसाठी नोकर भरती निघाली आहे. ONGCच्या भरती प्रक्रियेत पदवीधर आणि डिल्पोमा धारक अर्ज करू शकतात. 17 ऑगस्ट ही या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
ONGCमध्ये अप्रेंटिसच्या पदांसाठी उमेदवारांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार वेगवेगळी पदं ठरवण्यात आली आहेत. त्यानुसार संबंधित ट्रेडमध्ये पदवीधर किंवा आयटीआय डिप्लोमा असणं गरजेचं आहे.
- अकाऊंटंटसाठी कॉमर्स ग्रँज्युएट असणं गरजेचं
- असिस्टन्ट HRसाठी BA किंवा BBAची डिग्री असणं गरजेचं
- सेक्रेटेरियल असिस्टन्टसाठी सेक्रेटेरियल असिस्टेंट ट्रेडमध्ये ITI केलेला उमेदवार हवा
- लेबॉरेटरी असिस्टन्ट - PCM किंवा PCBमध्ये B.Sc.ची डिग्रीसोबत लॅब असिस्टन्ट ( कॅमिकल प्लांट) ट्रेडमध्ये ITI
- याशिवाय अन्य पदांसाठी उमेदवारानं संबंधित ट्रेडमध्ये ITI केलेलं असलं पाहिजे
वय मर्यादा अप्रेंटिसपदासाठी 18 ते 24 वर्ष ही वयोमर्यादा आहे. अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारांसाठी उच्च वय 5 वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी राखीव व्यवहारांसाठी 3 वर्षे वयांची सूट.
अर्ज कसा करावाइच्छुक आणि पात्र उमेदवार 17 ऑगस्ट 2020 पर्यंत अधिकृत वेबसाइट ongcapprentices.ongc.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
निवडीची तारीख - 24 ऑगस्ट 2020उमेदवारांकडून खात्री होण्याची तारीखः 24 ऑगस्ट 2020 ते 1 सप्टेंबर 2020
अन्य महत्त्वाच्या बातम्या
महेंद्रसिंग धोनीचा पहिला पगार किती होता माहित्येय; आज 760 कोटींचा धनी
निवृत्तीच्या घोषणेनंतर मेहंद्रसिंग धोनी अन् सुरेश रैनानं मारली मिठी; पाहा इमोशनल Video
सुरेश रैनाचे 'हे' विक्रम तुम्हाला करतील चकीत!
... म्हणून महेंद्रसिंग धोनीपाठोपाठ निवृत्तीसाठी सुरेश रैनानं 15 ऑगस्टचा दिवस निवडला
भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी तू एक आहेस - रोहित शर्मा
मला माहित्येय तुला रडावासं वाटतंय, पण...; पत्नी साक्षीची भावनिक पोस्ट