SBI SO Recruitment 2021: नवी दिल्ली : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नोटिफिकेशन जारी केले आहे. यामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर (Specialist Officer) पदांसाठी एकूण 606 भरती जारी केली आहे. (Sarkari Naukri SBI Recruitment 2021 Apply For 606 Posts Of SBI Last Date Is 18 October Know Registration Process)
या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर आहे. अशा परिस्थितीत, जे उमेदवार अर्ज करू इच्छितात, ज्यांनी अद्याप अर्ज केला नाही, त्यांना उद्यापर्यंत शेवटची संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात.
दरम्यान, उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी एकूण 606 भरतीसाठी 15 नोव्हेंबर 2021 रोजी परीक्षा घेतली जाईल. परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड 3 नोव्हेंबर रोजी जारी केले जाईल. तसेच, पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना सल्ला दिला जातो की, त्यांनी भरतीसाठी जारी केलेले नोटिफिकेशन तपासावे, त्यानंतरच अर्ज करावा.
असा करा अर्ज...- SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जा.- होम पेजवर उपलब्ध Latest Announcements लिंकवर जा.- आता RECRUITMENT OF SPECIALIST CADRE OFFICERS ON REGULAR/CONTRACT BASIS वर जा.- आता अनिवार्य क्रिडेंशियल नोंदवून रजिस्ट्रेशन करा.- त्यानंतर अर्ज भरा, आता त्याची प्रिंट घ्या आणि ठेवा.
रिक्त पदांची माहितीएकूण पदे - 606रिलेशनशिप मॅनेजर - 314 पदेरिलेशनशिप मॅनेजर टीम लीड - 20 पदेकस्टमर रिलेशन एक्झिक्यूटिव्ह - 217 पदेइन्वेस्टमेंट ऑफिसर - 12 पदेसेंट्रल रिसर्च टीम - 2 जागामार्केटिंग - 12 पदेडिप्टी मॅनेजर मार्केटिंग - 26 पदे
वयोमर्यादारिलेशनशिप मॅनेजर - 23 ते 35 वर्षेरिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) - 28 ते 40 वर्षेकस्टमर रिलेशन एक्झिक्यूटिव्ह - 20 ते 35 वर्षेइन्वेस्टमेंट ऑफिसर - 28 ते 40 वर्षेसेंट्रल रिसर्च टीम (प्रॉडक्ट लीड) - 30 ते 45 वर्षेसेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) - 25 ते 35 वर्षेमॅनेजर (मार्केटिंग) - 40 वर्षेडिप्टी मॅनेजर (मार्केटिंग) - 35 वर्षेएक्झिक्यूटिव्ह - 30 वर्षे