नवी दिल्ली : बँकेतनोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटरच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया 10 मार्चपासून सुरू झाली असून 31 मार्च 2023 पर्यंत चालणार आहे.
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 868 रिक्त जागा भरल्या जातील. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहीर केलेली अधिसूचना पाहावी.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादाएसबीआय आणि ई-एबीच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्यावरच बँकेच्या सेवेतून निवृत्त व्हायला हवे. अधिकारी स्वेच्छेने सेवानिवृत्त झालेले/राजीनामा दिलेले/निलंबित केलेले किंवा सेवानिवृत्तीपूर्वी बँकेतून बाहेर पडलेले अधिकारी नियुक्तीसाठी पात्र नाहीत. तथापि, स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या तारखेला वयाची 58 वर्षे पूर्ण केलेला आणि 30 वर्षे सेवा/पेन्शनपात्र सेवा (दोन्ही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे) पूर्ण केलेला कोणताही अधिकारी, वय गाठल्यावर यासाठी पात्र असणार आहेत.
...अशी होईल निवड शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ही मुलाखत 100 गुणांची असणार आहे. तसेच, मुलाखतीत यशस्वी उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. या पदांशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात.
कसा करावा अर्ज?- सर्व उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जा.- आता करिअर सेक्शनमध्ये जा.- येथे संबंधित पोस्टसाठी अधिसूचनेवर क्लिक करा.- अधिसूचना काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज भरा.- तसेच, आवश्यक कागदपत्रे अवलोड करा आणि सबमिट करा.