नवी दिल्ली : बँकेत नोकरी करून करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) 1000 हून अधिक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज प्रक्रियेत सामील होण्यासाठी 30 एप्रिल 2023 पर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतात. या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाने 1 एप्रिल रोजी जाहिरात (No.CRPD/RS/2023-24/02) जारी केली आहे.
इच्छुक उमेदवार अर्ज करण्यासाठी sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर आणि सपोर्ट ऑफिसर या पदांसाठी अर्ज करू शकतात. एकूण पदांची संख्या 1022 आहे. दरम्यान, ही भरती स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे Anytime चॅनेल अंतर्गत कराराच्या आधारावर केली जाणार आहे.
कोण करू शकतं अर्ज?विशेष म्हणजे, या भरतीच्या अर्ज प्रक्रियेत तरुण उमेदवार भाग घेऊ शकणार नाही. या पदांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा इतर सरकारी बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी अर्ज करू शकतील.
मुलाखतीद्वारे मिळेल नोकरीस्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. यासाठी सर्वात आधी मिळालेल्या उमेदवारांच्या अर्जांची पडताळणी करून एक शॉर्टलिस्ट करण्यात येईल. त्यानंतर त्यामधील उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. या मुलाखतीनंतर फायनल सिलेक्शन लिस्ट तयार केली जाईल.