-नितांत महाजन
सोशल मीडीया आपण आपल्या स्वतर्च्या ब्रॅण्डिगसाठी उत्तम वापरू शकतो. तसं ब्रॅण्डिंग करण्यात काही गैर नाही. आपण चांगलं काम करतो तर ते काम लोकांर्पयत, आपल्या क्षेत्रातील माणसांर्पयत पोहचणं, आपली एक उत्तम ओळख अर्थात इमेज बनवणं यात काही गैर नाही. इमेज मेकिंगसाठी आपण काही हजारो रुपये खचरुन पीआर नाही करू शकत. पण या काळात उत्तम करिअर करायचं असेल तर आपण, आपलं काम, हेच आपला ब्रॅण्ड बनलं पाहिजे. मात्र हे करण्याच्या नादात आपण आपली बदनामी करत नाही, आपली ब्रॅण्डव्हॅल्यू गमवत तर नाही ना याकडे लक्ष दिलेलं बरं. नाही तर हे ब्रॅण्डिगचं अस्त्र आपल्यावरच उलटायला वेळ लागत नाही.तर उत्तम सेल्फ ब्रॅण्डिग साठी या काही गोष्टी लक्षात ठेवा.
1) सोशल मीडीया फ्रेण्डससोशल मीडीयात आपले फार फॉलोअर्स आहेत हे दाखवण्यासाठी आपण आली ती प्रत्येक फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारतो. मात्र असे फ्रेण्ड जर आपल्या वॉलवर, पोस्टवर वाट्टेल ते बडबडत असतील किंवा स्वतर्च काहीबाही खरडत असतील तर ते आपली इमेज बिघडवतात. त्यामुळे मित्र इथंही पारखूनच घ्या.
2) सोशल मिडीयात मत मांडाल. एखादी कमेण्ट कराल तर ते अभ्यास करुन लिहा. पाचकळ पणा, लूज टॉक करू नका.3) तुम्ही जे लिहाल ते सम्यक, योग्य, अभ्यासपूर्ण असेल त्याला काही किंमत असेल असं इतरांना वाटलं पाहिजे.4) आपले पर्सनल फोटो, पर्सनल पाटर्य़ातले फोटो, पर्सनल नातेसंबंध याचं प्रदर्शन शक्यतो करू नये.
5) आपलं काम शेअर करा, पण ते नम्रपणे. तिथं शो ऑफ करू नका. मीच किती भारी, अंतिम सत्य मीच सांगितलं असं चित्र निर्माण करू नये.6) वाद झाला तरी ते तात्पुरते ठेवावे कुणाची व्यक्तिगत बदनामी करू नये.7) आपल्या क्षेत्राविषयी, कंपनीविषयी बदनामीकारक गोष्टी लिहू नये.8) काही अन्याय असेल तर ते लिहिताना अभ्यास करुन, पुरावे मांडून लिहावे.9) इतरांवर शेरेबाजी करू नये. कुणाचा अपमान करू नये.10) आपण अतीच बोलतो, वाचाळ आहोत अशी आपली इमेज होऊ नये.