डॉ. दीपक शिकारपूरउद्योजक, संगणक साक्षरता प्रसारकजघडीला आपला भारत देश एका संक्रमण अवस्थेतून जातो आहे. सध्या विविध आघाड्यांवरच्या प्रगतीचा किंवा विकासाचा वेग किंचित मंदावल्यासारखा दिसतो आहे खरा. मंदीचे ढग अजूनही क्षितिजावर रेंगाळत आहेत, ते पूर्णपणे दिसेनासे झालेले नाहीत. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आणि देदीप्यमान यश मिळवण्यासाठी जी बाब खऱ्या अर्थाने आवश्यक आहे ती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पैसा नव्हे, तर विविध कौशल्ये आत्मसात केलेली माणसे म्हणजे स्किल्ड मॅनपॉवर. माझ्या दृष्टीने ‘आयटी’ या शब्दप्रयोगाचा अर्थ आहे इंडियन टॅलेंट्स.. माहिती (डेटा), कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) आणि कनेक्टिव्हिटी या तीन घटकांचा समावेश असलेली चौथी औद्योगिक क्रांती आता जगात घडू लागली आहे. करिअर ही पदवीधर व्यावसायिकांसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. विसाव्या शतकात (१९७० पर्यंत) कुठलाही पदवीधर नोकरी मिळवू शकत होता. अनेकांना सरकारी नोकरी सुरक्षित म्हणून प्राधान्याने आवडत होती. अनेक व्यक्ती ‘एक नोकरी, एक करिअर’ असा विचार करीत होती.
ऑटोमेशनमुळे आयटी क्षेत्रातल्या नोकऱ्या धाेक्यातचांगल्या पॅकेजसाठी नोकरी बदलणे, करिअर बदलणे अगदी सहज घडते. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान नवीन संधी निर्माण करीत आहे; पण हे जरी सकारात्मक चित्र असलं, तरी रोजगार आपोआप निर्माण होणार नाही. त्यासाठी आपण पात्र आहोत का, हा विचार पदवीधरांनी केला पाहिजे. ऑटोमेशनमुळे आयटी क्षेत्रातल्या हजारो नोकऱ्या येत्या पाच ते दहा वर्षांत संपुष्टात येऊ शकतात. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कपातही होतेय. उद्योग-व्यवसायांत या गोष्टी होत राहणार. त्याची दुसरी बाजूही आहे. सायबर सुरक्षा, क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, बिग डेटा यांसारख्या क्षेत्रांमध्ये अनेक नवीन नोकऱ्या किंवा कामे उपलब्ध होतील. ज्या तंत्रज्ञानामुळे काही काळ बेरोजगारी वाढते तेच तंत्रज्ञान राबविण्यासाठी कालांतराने रोजगार उत्पन्न होतात, हे त्रिकालबाधित सत्य आपण स्वीकारले पाहिजे.
कौशल्य हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे; पण परीक्षा, गुण व पदवीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या विसाव्या शतकातील शिक्षण पद्धतीला अजून त्याचे महत्त्व कळलेले नाही. अनेक धुरिणांना कौशल्य म्हणजे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्याची शिक्षणपद्धती असेच वाटते. हीच खरे तर शोकांतिका आहे. एकीकडे शिकलेल्या लोकांना रोजगार मिळत नाही, तर दुसरीकडे उद्योग-व्यापाराला योग्य माणसे मिळत नाहीत. हा आपल्या शिक्षण पद्धतीचा दोष आहे. शिक्षण म्हणजे शाळा-कॉलेज, परीक्षा, घोकंपट्टी आणि अखेर पदवी हे आपल्या मनावर आतापर्यंत कोरलेले चित्र पुसण्याची आता वेळ आली आहे. पदवी कौशल्य कार्यानुभव = करिअर हे एकविसाव्या शतकातले समीकरण जितक्या लवकर शिक्षण पद्धतीला उमजेल तितक्या लवकर पदवीधर बेरोजगारांची समस्या सोडवली जाईल. बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीही लवचिक आणि बदलत्या गरजा वेगाने सामावून घेणारी असायला हवी. गुणांना (मार्क्स) कमी महत्त्व देऊन मूल्यांकनाला जास्त महत्त्व द्यायला हवे.
उद्योगाला सुसंगत अभ्यासक्रम विकसित करणे, तो शिकवणे हे अतिशय अवघड काम आजच्या शिक्षण पद्धतीला करावे लागत आहे. यामध्ये माजी विद्यार्थी, उद्योग, समुपदेशक, मार्गदर्शक (मेंटॉर्स) या सर्व घटकांना अंतर्भूत करावेच लागेल. कारण हे सर्व काम शिक्षक करू शकणार नाहीत. इथेच आपल्याला व्हर्च्युअल पद्धतीचा अवलंब करावा लागेलच.
२०२४ मध्ये आयटी क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील, तरीही उमेदवारांना स्पर्धात्मक राहण्यासाठी कठोर परिश्रम आणि योग्य कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, सायबर सुरक्षा आणि क्लाउड कॉम्प्युटिंगसारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या उदयामुळे नवीन रोजगारनिर्मिती होत आहे.
आगामी शतकाच्या करिअर वेधचे कोष्टक विसावे शतक एकविसावे शतकपरीक्षा कौशल्य मूल्यांकनपदवी नूतन प्रमाणपत्रअनुभव कार्यानुभव व अद्ययावत प्रमाणपत्रसुरक्षित नोकरी असुरक्षित रोजगारमर्यादित उद्योजक स्टार्टअप संस्कृतीभांडवल अभिनव कल्पनाजमीनजुमला उपयुक्त माहितीचा साठा