नवी दिल्ली : तुम्हाला अॅनिमेशन आणि गेमिंगमध्ये रस असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण येणारा काळ तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. Animation, VFX, Gaming, Comics म्हणजेच AVCG क्षेत्रात अनेक नवीन नोकऱ्या येणार आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारने दावा केला आहे.
भारत सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्सच्या रिपोर्टमध्ये असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, पुढील 8 वर्षांत AVCG क्षेत्रात 20 लाख नवीन नोकऱ्या येणार आहेत. त्यामुळेच सरकार या क्षेत्रांमध्ये शाळा ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत नवीन अभ्यासक्रम आणणार आहे.
सरकारच्या प्लॅनिंग आणि लेटेस्ट रिपोर्टद्वारे स्पष्ट झाले आहे की, ज्या व्हिडीओ गेम्स आणि कार्टूनसाठी पालक आपल्या मुलांना आत्तापर्यंत थांबवत असत, तेच शाळांमध्ये शिकवले जाणार आहे. एवढेच नाही तर या क्षेत्रांमध्ये कंटेंट तयार करणाऱ्यांनाही सरकार तांत्रिक आणि आर्थिक मदत करणार असल्याचे समजते.
Job Report मधील काय आहेत शिफारसी?केंद्राच्या टास्क फोर्सने आपल्या रिपोर्टमध्ये अनेक शिफारसी केल्या आहेत. अपूर्व चंद्रा हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आपला रिपोर्ट केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना सादर केला आहे. रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर, मंगळवार, 27 डिसेंबर 2022 रोजी सरकारने या शिफारसी लवकरात लवकर लागू करण्याचे सांगितले आहे. पुढील प्रमाणे आहेत शिफारसी...
- Create in India Campaign सुरू करणे. या शिफारशीनुसार सरकार देशभरात Create in India मोहीम राबवणार आहे. या अंतर्गत, सरकार भारतीय सामग्री निर्मात्यांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य प्रदान करेल. जेणेकरून या क्षेत्रांमध्ये भारतीय सामग्रीचा प्रचार होईल.- AVCG प्लॅटफॉर्म स्थापित करणे. देशात AVCG क्षेत्रासाठी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स तयार केले जाईल. तसेच, स्थानिक सरकारांच्या मदतीने राज्यांमध्ये प्रादेशिक केंद्रे स्थापन केली जातील.- देशातील विविध शहरांमध्ये गेमिंग एक्स्पोचे आयोजन करण्यात येईल. जेणेकरुन एफडीआय, को-प्रोडक्शन आणि इनोव्हेशनच्या संधी शोधता येतील.- अॅनिमेशनसाठी दूरदर्शनचे एक समर्पित चॅनेल असावे. रामायण, महाभारत प्रेरीत व्हिडिओ गेम्स तयार करावेत.- हे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी प्रत्येक शाळेत किमान दोन प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करावी. एक शिक्षक केजी ते इयत्ता 5वी पर्यंत, तर दुसरा शिक्षक 6वी ते 12वी पर्यंत.- यूजीसी मान्यताप्राप्त AVCG अभ्यासक्रम विद्यापीठ स्तरावर चालवले जावेत. जसे- PG/ BA in Experiential Arts, Bachelor in Graphic Arts (Comics and Animation Design), BSc in Game Development, Bachelor in Cinematic Arts (Comics, Animation, VFX), Bachelor of Creative Arts and Sciences.
सध्या 1.85 लाख प्रोफेशनलसरकारच्या इंटर-मिनिस्ट्रियलटास्क फोर्सचे अध्यक्ष चंद्रा म्हणाले, "सध्या भारतात AVCG क्षेत्रात सुमारे 1.85 लाख प्रोफेशनल आहेत. पण, बाजाराला यापेक्षा अधिक कुशल कामगारांची गरज आहे. या क्षेत्राचा विकास टिकवून ठेवण्यासाठी आम्हाला 2030 पर्यंत 20 लाख प्रोफेशनलची आवश्यकता असणार आहे." याचबरोबर, मीडियाशी संवाद साधताना टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणाले की, संपूर्ण जगात AVCG क्षेत्राची बाजारपेठ जवळपास 22.78 लाख कोटी रुपयांची आहे. सध्या यामध्ये भारताचा वाटा 24,855 कोटी रुपये आहे.