चांगली नोकरी मिळवण्यासाठी आपला रिझ्यूमे उत्तम असणं गरजेचं असतं. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. ते लोक नवीन नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसंच त्यांच्या हातात नोकरी आहे. त्यातील काहीजण नवीन कंपनीत नोकरीसाठी नक्कीच प्रयत्न करत असतील. तर आज आम्ही तुम्हाला लवकरात लवकर नोकरी मिळावी यासाठी रिझ्यूमे कसा असायला हवा याबाबत सांगणार आहोत. कारण तुमचा रिझ्यूमे पाहून मुलाखतीसाठी बोलवायचं की नाही ते ठरतं असतं, म्हणून बारिक सारिक वाटत असलेल्या गोष्टींकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.
तपासून घ्या-
करिअर एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार नेहमी रेझ्युमे तयार केल्यानंतर तपासून घ्या.आपल्या रेझ्युमे मध्ये शुद्धलेखन किंवा व्याकरणाच्या काही चुका तर नाही पडताळणी करून घ्या. कारण चूका असलेला रिझ्यूमे सुरूवातीलाच नाकारला जातो. रेझ्यूमे पाठवल्यानंतर चूक झाल्याचे लक्षात आल्यास पश्चाताप होऊ शकतो. म्हणून आधीच पडताळणी करून घ्या.
कमी शब्दात चांगली मांडणी
एचआर रेझ्यूमे जास्तवेळ देत नाहीत. त्यामुळे लांब लचक रिझ्यूमे लिहिण्यापेक्षा छोटा आणि आकर्षक असावा. लक्षात ठेवा की रेझ्युमे आपण केलेल्या प्रत्येक कामाचे प्रदर्शन करण्यासाठी नव्हे, तर हे दाखविण्यासाठी आहे की आपल्या कामाचा अनुभव आणि कौशल्य दाखवण्यासाठी आहे.
पीडीएफमध्ये पाठवा
आपला रेझ्युमे नेहमी पीडिएफ स्वरूपात पाठवा. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हायरिंग मॅनेजर सगळे रिझ्यूमे यात पद्धतीने पाहतात. आपण आपल्या रेझ्युमेला एखाद्या दुसऱ्या मार्गाने पाठवले तर, कदाचित त्याची शैली, स्वरूप आणि फॉन्ट आपल्या संगणकापासून थोडा वेगळा दिसत असेल. म्हणून घाई न करता पीडीएफ तयार करून रिझ्यूमे पाठवा. पैशांच्या बाबतीत 'या' गोष्टी लक्षात ठेवाल; तर कठीण प्रसंगात नक्की होईल फायदा
सुलभ आणि नीटनेटका
करिअर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हायरिंग मॅनेजर सहसा आपल्या रेझ्युमे बघण्यात फक्त सहा सेकंद देतात. म्हणून आपण आपला रेझ्युमे सुस्पष्ट आणि वाचण्यास सुलभ असणारे बनवावे. प्रत्येक विभाग ठळक असावे आणि प्रत्येक नोकरीचे शीर्षक ठळक असावे. रेझ्युमेला सोपं आणि आकर्षक बनविण्यासाठी टेम्पलेट्सचा वापर करा. शक्यतो रिझ्युमे एक किंवा दोन पानांचा असावा. त्यापेक्षा मोठा असल्यास पाहणाऱ्यासाठी अडचणीचं ठरू शकतं. महामारीच्या काळात जॉब मिळवायचा असेल तर 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात; वेळीच जाणून घ्या