शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम मध्य रेल्वेत मोठी भरती, 2500 हून अधिक जागांसाठी मागवले अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 09:46 IST

West Central Railway Recruitment 2022 : ही भरती मोहीम एकूण 2521 अप्रेंटिस रिक्त जागा भरण्यासाठी राबविण्यात येत आहे.

नवी दिल्ली : पश्चिम मध्य रेल्वेने (West Central Railway)तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पश्चिम मध्य रेल्वेने (WCR) अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर 17 डिसेंबरपर्यंत रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. ही भरती मोहीम एकूण 2521 अप्रेंटिस रिक्त जागा भरण्यासाठी राबविण्यात येत आहे.

वयोमर्यादा पश्चिम मध्य रेल्वेमधील या रिक्त पदांसाठी 17 नोव्हेंबर 2022 रोजी उमेदवारांचे वय 15 वर्षे पूर्ण झालेले असावे आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी अधिक वयाची सवलत लागू आहे.

शैक्षणिक पात्रता  अर्जदारांनी संबंधित ट्रेडमध्ये किमान 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि आयटीआय (NCVT/SCVTशी संलग्न) असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रियापश्चिम मध्य रेल्वेच्या अप्रेंटिस भरतीसाठी अर्जदार उमेदवारांनी इयत्ता दहावीमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज शुल्कपश्चिम मध्य रेल्वेच्या अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. महिला, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया- सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट wcr.indianrailways.gov.in ला भेट द्यावी.- त्यानंतर होम पेजवर असलेल्या एन्गेजमेंट ऑफ अप्रेंटिस अॅक्टवर क्लिक करा.- अप्रेंटिस भरतीसाठी अप्लाय लिंकवर क्लिक करा आणि स्वतःचे रजिस्ट्रेशन करा.- आता तुमचा अर्ज भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा.- त्यानंतर शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.- उमेदवारांनी भविष्यातील संदर्भासाठी एक प्रत डाउनलोड करून प्रिंटआउट घ्यावी.

टॅग्स :railway recruitmentरेल्वेभरतीwestern railwayपश्चिम रेल्वेjobनोकरीrailwayरेल्वे