प्रत्येक कंपनी, संस्थेत डेटा अॅनालिटिक्सची मागणी वाढत आहे. त्यामुळे करिअरच्या दृष्टिकोनातून यात नेमके काय केले जाते आणि यासाठीचे मोफत तसेच लवकर करिअर ग्रोथ करणारे कोर्सेस कोणते आहेत, हे आज पाहू.
नेमके काम काय? वेगवेगळे ट्रेंड तसेच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कच्च्या डेटाचे विश्लेषण करण्याचे महत्त्वाचे काम असते. अर्थात यासाठी अनेक तंत्र वापरले जातात आणि त्याचे वेगवेगळे उद्देशही असतात. एखादी संस्था- कंपनी कुठे आहे, तुम्ही कोठे होता, तुम्ही कोठे असायला पाहिजे, याबद्दलचे स्पष्ट चित्र याद्वारे मांडले जाते.
व्यवसाय वृद्धीसाठी डेटा अॅनालिटिक्स महत्त्वाचा भाग आहे, असे ७७ टक्के टॉपच्या संस्थांना वाटते. एक व्यावसायिक डेटा अॅनालिस्ट म्हणून तुम्ही याचे अनेक पैलूंनी चित्र मांडू शकता. या क्षेत्रात चांगला पगारही मिळतो. सुरुवातीची काही वर्षे उमेदवारीत गेल्यावर सहा आकडी पगार दरमहा मिळवून देण्याची यामध्ये ताकद आहे. विदेशातही नोकरीच्या मोठ्या संधी आहेत. सिंगापूर सरकारच्या वेबसाईटनुसार मोठ्या प्रमाणातील डेटामधून उपयुक्त माहिती वेगळी काढू शकणाऱ्या तज्ज्ञांना मोठी मागणी आहे.
अनेक संधी : डेटाअॅनालिटिक्सला वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळी नावे आहेत. मॅट्रिक्स अँड अॅनालिटिक्स स्पेशालिस्ट, डेटानोकरी, करिअर, सबकुछ
अॅनालिस्ट, बिग डेटा इंजिनिअर, ऑपरेशन अॅनालिस्ट, सेल्स अॅनालिस्ट, फायनान्शियल अॅनालिस्ट, मार्केटिंग अॅनालिस्ट, डेटा अॅनालिस्ट कन्सल्टंट अशी त्यांनी विविध नावे आहेत.
कोणत्याही क्षेत्रात काम करा : ४ क डेटा हा अॅनालिटिक्समध्ये मध्यवर्ती भूमिका बजावतो. या क्षेत्रात काम करताना तुम्हाला विशिष्ट इंडस्ट्रीमध्येच काम करण्याची गरज नाही. प्रत्येक क्षेत्राला डेटा अॅनालिटिक्सची गरज असते. आता फायनान्शियल, हेल्थकेअर, रिटेल, लॉजिस्टिक्स आणि एचआर मॅनेजमेंटमध्येही यांना मागणी वाढत आहे. लवकर ग्रोथ होण्यासाठी अनेक कोर्सेस करता येतील. डाटा अॅनालिस्ट होण्यासाठी अनेक ऑनलाईन मोफत कोर्सेसही उपलब्ध आहेत. बिझनेस अनलिटिक्स, डाटा सायन्समुळे विशिष्ट क्षेत्राचे तज्ज्ञ होता येते. चला तर मग करिअरचे नवे क्षितिज खुणावत आहे, त्याचे डोळसपणे स्वागत करू या.
संकलन : सुमंत अयाचित, मुख्य उपसंपादक