नवी दिल्ली : रोजगाराच्या क्षेत्रात यावर्षी बरेच चढउतार दिसून आले. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परिस्थितीत सुधारणा झाली आहे. यावर्षी कोणत्या क्षेत्राने सर्वाधिक नोकऱ्या दिल्या? तर ते आहे सेवा क्षेत्र. ही माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. यंदा या क्षेत्राने वार्षिक आधारावर ५ ते ७ टक्के रोजगार वृद्धी दिली आहे. गेल्या वर्षी रोजगारातील वृद्धी १६ टक्के राहिली होती. तंत्रज्ञानाधिष्ठित सेवादाता संस्था ‘अवसर’ने हे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, ३ ते ५ टक्के रोजगार वृद्धीसह एफएमसीजी क्षेत्र दुसऱ्या स्थानावर राहिले.
अहवालात म्हटले आहे की, २०२२ मध्ये विशेषत: पहिल्या तीन तिमाहींत वार्षिक आधारावरील एकूण रोजगारात २५ टक्के वृद्धी दिसून आली. डिजिटल सोल्युशन्सच्या माध्यमातून होणारी कर्मचारी भरती, हंगामी कामगारांची वाढती संख्या आणि कामाच्या बाबतीतील लवचिकता हे यंदाच्या कर्मचारी भरतीतील प्रमुख कल राहिले.
अखेरच्या तिमाहीत घटआर्थिक वर्ष २०२२ च्या शेवटच्या तिमाहीत रोजगारात ३४-३८ टक्के घसरण. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये मात्र भरतीतील वृद्धी सुरू राहीलहे क्षेत्र देणार नोकऱ्याnयेणाऱ्या वर्षात रिअल इस्टेट, बँकिंग, फेरनिर्माणक्षम ऊर्जा, आरोग्य आणि आयटी या क्षेत्रांत १५ टक्क्यांपर्यंत रोजगार वृद्धी अपेक्षित आहे.n वाहन व एफएमसीजी क्षेत्रांत अनुक्रमे १२ ते १० टक्के रोजगार वृद्धी होण्याची शक्यता आहे.