शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
4
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
5
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
6
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
7
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
8
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
9
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
11
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
12
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
13
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
14
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
15
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
16
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
17
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
18
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
19
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
20
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न

Xynergy 2025: शैक्षणिक प्रदर्शन आणि भविष्यातील संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 09:34 IST

सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या प्रांगणात २५ फेब्रुवारी २०२५ रोजी एक शैक्षणिक प्रदर्शत, Xynergy 2025 आयोजित करण्यात आले होते.

सध्या सर्वत्र दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मग पुढच्या अभ्यासक्रम निवडीबद्दल उत्सुकता, त्याची वेगळी तयारी, विद्यार्थ्यांना येणारा ताण आणि त्याबद्दल माहिती गोळा करणे हे ओघाने आलेच. याच पार्श्वभूमीवर, सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या प्रांगणात २५ फेब्रुवारी २०२५ रोजी एक शैक्षणिक प्रदर्शत, Xynergy 2025 आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता आश्वासन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता आठवी ते बारावी या वयोगटासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. प्रामुख्याने, कॉलेजमधील विविध विभाग, त्याद्वारे आयोजित करण्यात येणारे शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम, उच्च शिक्षणानंतरची संधी, याबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली गेली. प्रदर्शन पाहायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना ही माहिती वेगवेगळ्या स्टॉलवर, मॉडेल्स, शैक्षणिक खेळ, प्रश्नमंजुषा यांच्या माध्यमातून दिली गेली. या प्रदर्शनाचे उद्घाटन भूगर्भ शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. ऋषिकेश सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. उपप्राचार्य विज्ञान आणि कला शाखा श्री. मरझबान कोतवाल आणि श्रीमती अल्पना पालखीवाले, Xynergy टीमच्या वतीने डॉ. शाइनी पीटर आणि इतर मंडळी उपस्थित होती. विद्यार्थ्यांसाठी केलेला हा उपक्रम सकाळी १० ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत खुला होता. 

एकूण २८ विभाग आणि कॅम्पसमध्ये कार्यरत असलेले झेविअर्स रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेंज्ड या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते. गणित विभागाच्या अंतर्गत बुफॉन नीडल सिम्युलेशनचे प्रत्ययकारी मॉडेल तयार केले होते. त्याचबरोबर प्रसिद्ध गणितज्ज्ञांची माहिती उपलब्ध करून दिली गेली. फुटबॉल खेळाडूंची कामगिरी नोंदवण्यासाठी Footstats नावाचा वापर केल्याचे प्रात्यक्षिक माहिती तंत्रज्ञान या विभागाच्या स्टॉलवर होते. भौतिकशास्त्र विभागाने बीट फ्रिक्वेन्सी या संकल्पनेचे प्रात्यक्षिक सादर केले. त्याचबरोबर गतीच्या संकल्पनेचा प्रयोग मुलांच्या सहभागातू सादर केला. सूक्ष्मजीवशास्त्र या विभागाने विविध प्रकारच्या सूक्ष्म जीवाणूंविषयी माहिती दिली, तसेच याचा अभ्यास पूर्ण झाल्यावर भविष्यात निर्माण होणाऱ्या नोकरीच्या संधींबद्दल देखील चर्चा केली.

वनस्पतीशास्त्र अर्थात बॉटनी विभागाने हर्बल चहा कसा करायचा हे दाखवले, तर जैव तंत्रज्ञान विभागाने शहराचे एक सिम्युलेशन मॉडेल करून मुलांना चकित केले. प्राणिशास्त्र विभागाने प्राण्यांची शरीररचना मॉडेल्सच्या रुपात दाखवली. डायमंड स्मॅशिंग, भूगर्भ जगातील हालचाली, पाषाण काळातील जीवाश्म याबद्दलची चर्चा भूगर्भ विभाग, भूविज्ञान या स्टॉलवर पाहायला मिळाली. जैवविज्ञान व जैवरसायनशास्त्र या विभागाने साइटोप्लाज्मिक स्टिमिंग मुलांना दाखवले. सांख्यिकी विभागाने रिव्हर्स तबू हा खेळ आणि फलंदाजाबद्दल सांख्यिकी माहिती कशी नोंदवायची हे खेळांच्या माध्यमातून दाखवले. 

वाणिज्य आणि अर्थशास्त्र विभागाने त्यांचे विविध उपक्रम, पॉडकास्ट, अर्थव्यवस्थेवरील अभ्यास यांची माहिती दिली. व्यवस्थापन शास्त्र विभागाने त्यांचा अभ्यासक्रम आणि रोजगारसंधी याबद्दल मुलांशी चर्चा केली. भारतीय संस्कृती, इतिहास आणि त्याचे वर्तमानाशी असलेले नाते अभ्यास आणि संधी Ancient Indian History and Culture विभागाने समजावून सांगितले. मानसशास्त्र आणि भाषा विभागाने त्यांच्या वार्षिक उपक्रमांमध्ये खंडाळा परिसंवाद, इंग्रजी विभागाचा 'इथका' हा इंग्रजी नाट्य महोत्सव, फ्रेंच कवी आणि लेखक यांचा अभ्यास फ्रेंच विभागाने मुलांसमोर सादर केला. हिंदी विभागाने इयत्ता आठवी आणि नववीमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी तयार केलेल्या पुस्तकमालेबद्दल माहिती दिली. मास कम्युनिकेशन विभागाने मुलांसाठी न्यूज अँकरचा खेळ आयोजित केला होता. तसेच, या अभ्यासक्रमानंतर उपलब्ध असलेल्या संधींबद्दल माहिती दिली. राज्यशास्त्र विभागाद्वारे आयोजित करण्यात येणारा वार्षिक परिसंवाद आणि पुढील शिक्षणासाठी लागणारी तयारी याबद्दल चर्चा केली, तर समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र यामध्ये सभोवतालचा आणी मीडियाचा होणारा परिणाम याबद्दल माहिती दिली.

पत्रकारिता, सिनेमा, जाहिरात या विविध माध्यमांचा अभ्यासक्रम राबविणारे XIC यांचाही इथे स्टॉल होता. ज्यामध्ये पदव्युत्तर शिक्षणाबद्दल माहिती दिली गेली. तसेच, XRCVC अर्थात, Xaviers Resource Centre for the Visually Challenged याद्वारे अंध व्यक्ती आणि दिव्यांगजनांसाठी सुलभ शैक्षणिक सामग्री तयार करते, याबद्दल माहिती दिली. 

एकूणच, कॅम्पसमध्ये राबविले जाणारे अभ्यासक्रम, त्याद्वारे मिळणारे प्रशिक्षण आणि ज्ञान, भविष्यातील संधी यांची एक झलक म्हणजे हे प्रदर्शन. विविध विभागांतील मुलांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी याचा लाभ घेतला.