Video: दादूसच्या साथीने तृप्ती देसाईंनी केला कोळी गाण्यावर डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 01:45 PM2021-11-01T13:45:00+5:302021-11-01T13:45:00+5:30

Bigg boss marathi 3: तृप्ती देसाई आणि दादूस यांचा डान्स पाहून घरातील स्पर्धकांनी हा क्षण मनापासून एन्जॉय केला.

bigg boss marathi 3 house trupti desai and dadus koli song dance video viral | Video: दादूसच्या साथीने तृप्ती देसाईंनी केला कोळी गाण्यावर डान्स

Video: दादूसच्या साथीने तृप्ती देसाईंनी केला कोळी गाण्यावर डान्स

googlenewsNext

बिग बॉस मराठीचं (bigg boss marathi) तिसरं पर्व सुरु होऊन आता एक महिन्याचा कालावधी लोटून गेला आहे.  या घरात स्पर्धकांनी प्रवेश करुन आज ३१ दिवस झाले आहेत. या ३१ दिवसांमध्ये घरात अनेक घडामोडी घडल्या. राग,रुसवे-फुगवे, भांडण कधी मैत्री सारं काही पाहायला मिळालं. यामध्येच काही जणांमध्ये पहिल्या दिवसापासून मतभेद आहेत. तर काही जणांमध्ये छान मैत्री आहे. यातलीच एक जोडी म्हणजे दादूस (dadus) आणि तृप्ती देसाई( trupti desai). पहिल्या दिवसापासून या दोघांमध्ये छान मैत्री झाल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे या दोघांनी नुकताच बिग बॉसच्या घरात एका कोळी गीतावर डान्स केला आहे.

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये तृप्ती देसाई आणि दादूस एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे एका चाहतीने ही इच्छा व्यक्त केल्यामुळे तृप्ती देसाई डान्स करताना दिसून आल्या.

'बिग बॉस'च्या चावडीवर काही प्रेक्षकांनी त्यांच्या मनातील इच्छा स्पर्धकांना सांगितल्या. यात एका प्रेक्षकाने दादूलसा पाठिंबा देत तृप्ती देसाईंसोबत कोळी गाण्यावर डान्स करण्याचा आग्रह धरला. या विनंतीचा मान राखत दोघांनीही डान्स केला. 

'Bigg boss'च्या घरात आलेली नीथा शेट्टी आहे तरी कोण? 'गंदी बात'मध्ये दिलेत जबरदस्त बोल्ड सीन

दरम्यान, 'टाईमपास' या चित्रपटातील 'ही पोली साजूक तुपातली' या गाण्यावर दोघांनी डान्स केला. त्यांचा डान्स पाहून घरातील स्पर्धकांनी हा क्षण मनापासून एन्जॉय केला. सोबतच घरात हास्यकल्लोळदेखील झाल्याचं दिसून आलं. 
 

Web Title: bigg boss marathi 3 house trupti desai and dadus koli song dance video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.