लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शेतकऱ्यांच्या व बेरोजगारांच्या विविध मागण्या संदर्भात आज वरोरा येथील रत्नमाला चौकात इंदिरा काँग्रेसच्या वतीने नागपूर- चंद्रपूर मार्गावरील वाहतूक रोखून धरली. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहणाच्या लांबच रांगा लागल्या होत्या.खा. धानोरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडो शहरी व ग्रामीण भागातील पुरुष, महिला व युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. नागपूर-चंद्रपूर मार्गावरील आनंदवन चौकानजीक रस्त्यावर टायर जाळल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.अतिवृष्टीमुळे कपाशी पिकाची वाढ होवू शकली नाही. फुलांची संख्या कमी असल्याने बोंडे कमी येतील. त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात घट होणार आहे. सोयाबिन पिकावर अतिवृष्टीमुळे अळ्याचा प्रादूर्भाव झाल्याने फुले व शेंगा आल्या नाही. पिकांचे पूर्णत: नुकसान झाले. पिकांचे सर्व्हेक्षण करुन प्रति हेक्टरी ६० हजार आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, हंगामी पीक कर्ज माफ करण्यात यावे, अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, आयएसएमटी व साई वर्धा पॉवर प्लँट कार्यान्वित करण्यात यावा आदी समस्याबाबत दोन दिवसांपूर्वीच खा. धानोरकर यांनी प्रशासनाला निवेदन दिले होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. १९ सप्टेंबर रोजी वरोरा शहरातील रत्नमाला चौक नागपूर- चंद्रपूर मार्गावर खा. बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात रस्त्या रोखो करुन वाहतूक ठप्प करण्यात आली. दरम्यान, आनंदवन चौकानजीक रस्त्यावर टायरही जाळण्यात आले. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझविली. रस्ता रोको आंदोलनात डॉ. आसावरी देवतळे, सुनंदा जीवतोडे, प्रकाश मुथा, प्रतिभा धानोरकर, दिनेश चोखारे यांच्यासह शेतकरी, बेरोजगार उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वरोऱ्यात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 6:00 AM
खा. धानोरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडो शहरी व ग्रामीण भागातील पुरुष, महिला व युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. नागपूर-चंद्रपूर मार्गावरील आनंदवन चौकानजीक रस्त्यावर टायर जाळल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
ठळक मुद्देरस्त्यावर टायर जाळले : ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही केली मागणी