१५५७
मिळालेला निधी
१,३८,६५०००
प्रती शिक्षक निधी
२ हजार ४५५
साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी अद्यापपर्यंत पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झाल्या नाहीत. दरम्यान, महिनाभरापूर्वी पाचव्या वर्गापासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार शाळा सुरू झाल्या असल्या तरी स्वच्छता, सॅनिटायझर, साबण आदींवर लागणारा खर्च कुठून करावा, यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, एक महिन्यानंतर का होईना जिल्ह्यातील १ हजार ५५७ शाळांच्या खात्यात स्वच्छतेसाठी १ कोटी ३८ हजार ६५ हजार रुपयांचा निधी जमा केला आहे. यामुळे शिक्षकांसह शाळा व्यवस्थापन समितीला दिलासा मिळाला आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संकटामुळे शाळा बंद होत्या. दीड महिन्यांपूर्वी ९ वी ते १२ चे तर २७ जानेवारीपासून ५ ते ८ वीचे वर्ग सुरू करण्याची शासनाने परवानगी दिली. मात्र, ही परवानगी देतानाच कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य काळजी घेण्याचेही बजावण्यात आले आहे. यासाठी स्वच्छता, सॅनिटायझर, मास्क एवढेच नाही तर साबण, पाणी पुरविण्याच्या सूचना शासनाने शिक्षण विभागाला दिल्या. त्यानुसार शाळांनी तयारी सुरु करून शाळा सुरू केली. मात्र, निधीची कमतरता आणि शासनाचे आदेश यामुळे इकडे आड, तिकडे विहीर अशी काहीशी अवस्था मुख्याध्यापक, शिक्षकांची झाली होती. त्यातच काही ग्रामपंचायतींनी हात वर केल्यामुळे स्वच्छतेसाठी लागणारा खर्च भागविताना मुख्याध्यापकांची चांगलीच कसरत बघायला मिळाली. अनेक मुख्याध्यापकांनी स्वत:च्या खिशातून खर्च केला. मात्र, आता शाळा सुरू झाल्यानंतर शासनाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाला स्वच्छतेसाठी प्रतिशिक्षक २ हजार ४५५ रुपयाप्रंमाणे शाळांच्या पोषण आहार योजनेच्या खात्यात निधी जमा केला आहे. त्यामुळे सध्यातरी शाळांची स्वच्छता, सॅनिटायझरची समस्या सुटली आहे.
कोट
स्वच्छतेसाठी शाळांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले आहे. यातून स्वच्छतागृहांची स्वच्छता तसेच इतर आवश्यक बाबींवर खर्च करता येणार आहे.
- दीपेंद्र लोखंडे
शिक्षणाधिकारी, प्राथमिक