शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

१ लाख १७ हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

By admin | Published: June 13, 2017 12:35 AM

गेल्या वर्षी खरीप व रबी हंगामात जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ३४९ शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करण्यात आले होते.

चंद्रपूर : गेल्या वर्षी खरीप व रबी हंगामात जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ३४९ शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करण्यात आले होते. तर यावर्षी खरीप हंगामामध्ये मे अखेरीस ४५ हजार १५१ शेतकऱ्यांंना कर्ज वाटप करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांकडे थकीत कर्ज नसल्याने त्यांना यावर्षी नवीन कर्ज देण्यात आलेले आहे. गेल्या वर्षी खरीप व रबी हंगामात ७४१ कोटी ४६ लाख ८ हजार रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा बँकेने ७७ हजार ५९७ शेतकऱ्यांना ४३३ कोटी ५१ लाख ८८ हजार रुपये, राष्ट्रीयकृत बँकांनी ३३ हजार ३६१ शेतकऱ्यांंना २५९ कोटी ५८ लाख ६० हजार रुपये आणि ग्रामीण विकास बँकेने ६ हजार ३९१ शेतकऱ्यांना ४८ कोटी ३५ लाख ६० हजार रुपयांचे पीककर्ज दिले. त्यापैकी जिल्हा बँकेकडून ३५ हजार ३६०, राष्ट्रीयकृत बँक ८ हजार ५५० आणि ग्रामीण बँकेकडून १ हजार २४१ शेतकऱ्यांनी नवीन कर्जाची उचल केली आहे, अशीही माहिती सुत्राने दिली.डॉ. पंजाबराव देशमुख शेतकरी स्वावलंबन मिशन२००८मध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देतानाच विदर्भातील आत्महत्याग्रस्त अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या सहा जिल्ह्यांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख शेतकरी स्वावलंबन मिशन राबविण्यात आले होते. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीपुरक उद्योग व व्यवसाय करण्यासाठी मदत करण्यात आली. तसेच मोठ्या शेतकऱ्यांना कर्जसवलत देण्यात आली होती. त्यामध्ये चंद्रपूर जिल्हा बँकेअंतर्गत पाच एकपेक्षा अधिक शेती असलेल्या ६ हजार २२७ शेतकऱ्यांना ११ कोटी ११ लाख ५७ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला होता.