चंद्रपूर : कोरोनाचा धोका ज्येष्ठांना असल्याने घराबाहेर पडणे बंद आहे. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्तीमध्ये गुडघेदुखीच्या तक्रारी वाढल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत जिल्हा सामान्य रुग्णालयात गुडघेदुखीचे प्रमाण येण्याची संख्या ८ ते १० टक्के वाढली आहे. त्यामुळे ज्येष्ठांना आपली काळजी घेणे गरजेचे आहे.
अनेक ज्येष्ठ व्यक्तींना, बीपी, शुगर असण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. अशा रुग्णांना कोरोना होण्याची दाट शक्यता असल्याने घराबाहेर पडणे टाळण्याच्या सुचना प्रशासनानी दिल्या होत्या. त्यामुळे मार्च महिन्यांपासून घराबाहेर पडणे बंद आहे. परिणामी वजन वाढत आहे. तसेच हिवाळ्याच्या दिवसात संधीवाताच्या रुग्णांमध्ये स्टिटनेस येत असल्याने गुडघेदुखीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात चिकण गुणीयासारख्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या रुग्णांमध्ये गुडघे दुखण्याची समस्या जाणवत आहे. अशा रुग्णांनी सकाळी व्यायम करणे, संतुलीत आहार घेणे, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
बॉक्स
वाढते वजन कारणीभुत
कोरोनामुळे अनेकांचे घराबाहेर पडणे बंद आहे. या कालावधीत एकत्र कुटुंब असल्याने घरी नवनवीन चमचमीत पदार्थ बनवून खाण्यात आले. मात्र व्यायम व सकाळी फिरणे बंद झाले. त्यामुळे आपोआपच वजन वाढले आहे. त्यामुळे या समस्या जाणवत आहे. ग्रामीण भागात अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात केवळ तेल मॉलीश करीत असतात. मात्र त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
बॉक्स
गुडघादुखीची अशी घ्यावी काळजी
गुडघे दुखीच्या रुग्णांनी सकाळी फिरायला जावे. ज्यांना चालता येत नाही. त्यांनी घरीच व्यायम करावा, सतत एका ठिकाणी बसून राहू नये, दोन तासानंतर उठून थोडे चालावे. सकस आहार घ्यावा, जेवनापूर्वी सलाद खावा, सुगर, बीपीच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानी उपचार घेवून सुगर व बीपी कंट्रोलमध्ये ठेवावी. गुडघेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी रोज सकाळी कोवळ्या उन्हामध्ये बसणे, कॅल्शिअमयुक्त पदार्थ घेणे आवश्यक आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानी उपचार घ्यावा.
कोट
करोनोमुळे ज्येष्ठ व्यक्तींचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. त्यामुळे त्यांचे वजन वाढले आहे. तसेच थंडीच्या दिवसात गुडघ्यामध्ये स्टिटनेस येत असतो. त्यामुळे गुडघे दुखत असतात. मागील वर्षींच्या तुलनेत यंदा गुडघे दुखीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा रुग्णांनी नियमित व्यायम करावा.
- डॉ. निवृत्ती राठोड, शल्य चिकीत्सक, चंद्रपूर