या बैठकीत संजय गांधी विधवा व अपंग योजनेअंतर्गत ३३, श्रावणबाळ योजनेअंतर्गत ५२, इंदिरा गांधी विधवा योजनेअंतर्गत दोन, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेअंतर्गत १२, दुर्धर आजार परित्यक्ता सिकलसेल घटस्फोटित योजनेअंतर्गत पाच, अशा १०४ प्रकरणांना मंजुरी, तर १६ प्रकरणे नामंजूर करण्यात आली.
पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातल्याने दोन महिने बैठक घेता आली नाही. तरी जून महिन्यात तात्काळ बैठक आयोजित करून १०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. बैठकीत जास्तीत जास्त प्रमाणात प्रकरणांना मंजुरी मिळाल्याने दीर्घ काळापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या निराधार, विधवा, वृद्ध, अंध, अपंग नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष उमेश राजूरकर, पदसिद्ध सचिव तथा तहसीलदार महेंद्र वाकलेकर, नायब तहसीलदार प्रवीण चिडे, अव्वल कारकुन राजेश ढोबळे, नीशा सोयाम, देवा थेटे, अशासकीय सदस्य आशिष वांढरे, मिलिंद ताकसांडे, रेखा घोडाम, प्रमोद पिंपळशेंडे, विलास आडे, अनिल निवलकर आदी उपस्थित होते.