चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोनाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांचा मृत्यू झाला. शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १०८ महिलांनी आयुष्यभराचा जोडीदार कायमचा गमावला आहे. काही महिलांचा अपवाद वगळता आता केवळ शासकीय योजनांचा आधार त्यांना आहे. या जोडीदार गमावलेल्या महिलांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने शोध सुरु असून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा झाली. काहींनी दुर्लक्ष केले तर काहींना वेळेत उपचार मिळू शकले नाही. परिणामी अनेकांचा जीव गेला. यामध्ये कुटुंबाचा आधार गेल्याने शेकडो कुटुंबीय रस्त्यावर आले आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबातील कर्ता पुरुषच गेल्यामुळे कुटुंबाची वाताहत सुरु आहे. त्यामुळे शासकीय योजनांच्या आधारावर जगण्याचा एकमेव आधार त्यांच्याकडे आहे. मात्र शासकीय योजना मिळविण्यासाठी अनेक कागदपत्र तसेच शासकीय निकषात बसावे लागते. तरच योजनांचा लाभ मिळतो. त्यामुळे या योजनांपासूनही या महिला वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासकीय स्तरावर निर्णय घेऊन प्रत्येक महिलांना शासनाने आधार द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
बाॅक्स
अशिक्षितपणा येतोय आड
कोरोनामुळे आयुष्यभराचा असलेल्या जोडीदाराला गमावल्यानंतर जगण्याचा मोठा प्रश्न या महिलांवर येऊन पडला आहे. त्यामुळे शासकीय मदत मिळेल, अशी अपेक्षा त्यांची आहे. मात्र शासकीय योजनांसाठीही अनेक कागदपत्र गोळा करावी लागतात. त्यामुळे कागदपत्र गोळा करताना त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यातच अशिक्षितपणा आड येत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण-
बरे झालेल्या रुग्णांची संख्या-
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण-
बाॅक्स
या आहेत शासकीय योजना
१. संजय गांधी निराधार योजना
२. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना
३.इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
५. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना
६) राष्ट्रीय अर्थसहाय्य कुटुंब योजना
बाॅक्स
असे लागणार कागदपत्र
कुटुंबाचा उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, वयाचा दाखवा, पतीच्या मृत्यूचा दाखला
बाॅक्स
असा करा अर्ज
अर्जदाराने शासन निर्णयानुसार आर्थिक साहाय्य मिळवण्यासाठी निर्धारित केलेल्या परिशिष्ट १ मधील नमुना तीन मधील अर्जाच्या दोन प्रतीमध्ये, राहात असलेल्या भागातीत संबंधित तलाठ्याकडे अर्ज करावा.
कोट
जिल्ह्यातील कोरोनाने निराधार झालेले बालक तसेच महिलांचा शोध घेणे सुरु आहे. या बालकांची तसेच महिलांची वाताहत होऊ नये यासाठी शासकीय निकषानुसार लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
-अजय साखरकर
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, चंद्रपूर