दिलीप मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : घोडाझरी सिंचन शाखा नवरगाव अंतर्गत विविध ११ पदे मागील दीड वर्षापासून रिक्त असून उपलब्ध असलेल्या कर्मचारी, अधिकाºयांच्या भरोशावर काम करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.सदर कार्यालयांतर्गत तीन हजार ८२४ हेक्टर शेती सिंचनाखाली येत असून एवढा मोठा पसारा सांभाळण्यासाठी शाखा अभियंता आवश्यक असताना मागील दीड वर्षापासून हे मुख्य पद प्रभारीच्या खांद्यावर आहे. शाखा अभियंता म्हणून काम पाहतात. त्यांच्याकडे नागभीड, नवरगाव आणि मेंडकी या तीन विभागाचा कारभार आहे. व्यक्ती एक आणि तीन ठिकाणाचा कारभार असल्याने ते एखादे वेळी नवरगावला भेट देतात. त्यामुळे पूर्णवेळ नवरगावला शाखा अभियंत्यांची गरज आहे.पाणी वाटपाच्या दृष्टीकोनातून चार बिट पाडले असून गिरगाव बिट क्रमांक एक व दोन, नवरगाव बिट क्रमांक तीन आणि गडबोरी बिट क्रमांक चार असे विभाग असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा कालवे निरीक्षक आहेत. ही सहाही पदे रिक्त आहेत. कालवा चौकदार चार, दप्तर कारकून एक, मोजणीदार एक व शिपाई पदाची एक अशी एकूण १४ पदांची गरज असताना आजघडीला कालवा चौकीदार, दप्तर कारकून आणि मोजणीदार ही तीनच पदे कार्यरत आहेत. नवरगाव येथील कार्यालयाची दैनावस्था असून कवेलूचे छप्पर असलेला बंगला आहे. ऐन पावसाळ्यात वादळ आल्याने येथील दूरभाष केंद्राचे टॉवर कार्यालयावर कोसळले. मात्र ते पेंडींग सामानाच्या रूमच्या छतावर कोसळले. त्यामुळे कुठलीही जिवितहानी झाली नाही. मात्र त्यावरील कवेलूचे, टॉवरचे नुकसान झाले आहे. तसेच कार्यालयीन इमारत इंग्रजाच्या काळातील असून जिर्ण झालेली आहे. बरेच कवेलू माकडांच्या हैदोसाने फुटले आहेत. त्या ठिकाणी कामकाज करणे शक्य नसल्याने शाखा अभियंता यांचे क्वार्टर बाजूलाच पडित अवस्थेत होते. त्यावर ताडपत्री बांधून कार्यालयीन कामाचा डोलारा कसाबसा समोर रेटला जात आहे. त्यामुळे येथे कार्यालयीन कामासाठी नवीन इमारतीची व शाखा अभियंता यांना निवासी राहण्यासाठी नवीन वास्तु बांधण्याची गरज आहे. कार्यालयीन परिसर मोठा असला तरी त्या परिसराची साफसफाई करण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या दिवसात या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा वाढलेला असतो. केवळ स्वातंत्र्य दिन आला की ज्या परिसरात झेंडा वंदन होते. त्याच ठिकाणचा परिसर स्वच्छ केला जातो.
सिंचन शाखेत १४ पैकी ११ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:24 PM
घोडाझरी सिंचन शाखा नवरगाव अंतर्गत विविध ११ पदे मागील दीड वर्षापासून रिक्त असून उपलब्ध असलेल्या कर्मचारी, अधिकाºयांच्या भरोशावर काम करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
ठळक मुद्देकार्यालयाची इमारत जीर्ण : ताडपत्री टाकून चालतो कारभार