शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

वाहनधारकांकडून वसूल केला १.१४ कोटींचा दंड

By admin | Published: November 23, 2014 11:15 PM

वाहतूक सुरळीत चालावी यासाठी वाहतूक विभागाने अनेक नियम लावून दिले आहे. मात्र वाहनधारक नियमांना पायदळी तुडवीत अपघातांना आमंत्रण देत आहे. वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे,

पोलिसांची कामगिरी : ४८ हजार ४३५ वाहनधारकांवर कारवाईचंद्रपूर : वाहतूक सुरळीत चालावी यासाठी वाहतूक विभागाने अनेक नियम लावून दिले आहे. मात्र वाहनधारक नियमांना पायदळी तुडवीत अपघातांना आमंत्रण देत आहे. वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, त्यांना शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाने चालू वर्षामध्ये विविध मोहीम राबवून वाहनधारकांना नियमांची ओळख करून दिली आहे. एवढेच नाही तर, ज्यांनी नियम तोडले त्यांच्याकडून मागील १० महिन्यांमध्ये तब्बल १ कोटी १४ लाख रुपये दंड वसुल केला आहे.चंद्रपूर शहराचा विचार केल्यास मागील १० महिन्यांत २८ हजार ५३० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. यात ३३ लाख ५३ हजार ५० रुपयांचा दंड वसुल केला आहे. यात सर्वाधिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. सर्वाधिक दंड वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या तथा पीयुसी नसलेल्या वाहनधारकांकडून वसुल केला गेला आहे. चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरु आहे. वाहतूक विभागाने ३०२ वाहनांवर कारवाई करीत २ लाख ९६ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे. तर ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ५ वाहनांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ९० हजार ३५० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.ग्रामीण क्षेत्रातही वाहनधारक पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेक करीत मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरु आहे. काही वाहनधारकांवर ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांमार्फत कारवाई करण्यात आली. मागील १० महिन्यांमध्ये जिल्ह्यामध्ये विविध गावांमध्ये १९ हजार ८९६ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६७ लाख १४ हजार १३० रुपये वसूल करण्यात आले आहे. यात १७ हजार ३२३ वाहनधारकांकडून २२ लाख २९ हजार ९५० रुपये, ६७३ ओव्हरलोड वाहनधारकांकडून २५ लाख ९७ हजार ७८० रुपये तसेच अवैध यात्रा परिवहन करणाऱ्या १ हजार ९०० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १८ लाख ८६ हजार ४०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. दंड वसुल केला असला तरी वाहनधारक वाहतूक नियमानुसार वाहन वाचविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.(नगर प्रतिनिधी)