लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रेतीचे खणन तसेच वाहतुकीवर बंदी असतानाही काही तस्कर मोठ्या प्रमाणात रेती तस्करी करून अव्वाच्या सव्वा दराने ग्राहकांना विकत आहे. यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत आहे. ही तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र तस्कर अधिकार्ऱ्यांची नजर चुकवून आपला धंदा सुरुच ठेवत आहे. यावर आळा घालण्यासाठी चंद्रपूर तालुका प्रशासनाने पथकांचे गठन केले आहे. मागील दोन वर्षांमध्ये १२६ रेती तस्करी करणारे वाहने जप्त करण्यात आले आहे. या माध्यमातून प्रशासनाने १ कोटी २३ लाख ६८ हजार ८५५ रुपयांचा दंड वसूल केला असून शासन तिजोरीत भर घातली आहे.सध्या कोरोनाची दहशत आहे. यामुळे आरोग्य प्रशासनासह महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कामाला लागले आहे. हिच संधी साधत काही तस्कर रेती तस्करी करून मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडवित आहे. त्यामुळे आता महसूल प्रशासनाने कारवाईचा सपाटा सुरु केला आहे.विशेष म्हणजे, मागील दोन वर्षामध्ये रेती तस्करीच्या १२६ वाहनांवर चंद्रपूर तहसील प्रशासनाने कारवाई केली असून १ कोटी २३ लाख ६५ हजार ८५५ रुपयांचा दंड वसुल केला आहे. यासाठी विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान, जप्त केलेल्या रेतीचा लिलाव करण्यात आला असून यातून १८ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या कारवाईलाही रेती तस्कर घाबरत नसल्यामुळे प्रशासनाने आता अधिकािधक कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.७ रेती घाटातून रेती तस्करीचंद्रपूर तालुका प्रशासनाच्या हद्दीमध्ये सात रेती घाट आहे. यातील कोणत्याही रेती घाटांचे लिलाव झाले नाही. परिणामी रेती तस्कर प्रशासनाची नजर चुकवून तसेच रात्रीच्या वेळी रेतीची तस्करी करीत आहे. या माध्यमाधून लाखो रुपयांचाी माया जमवित असून शासनाचा महसूल बुडवित आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनानेही आता त्यांच्यावर कारवाई करणे सुरु केले आहे. दरम्यान सात घाटांपैकी चार रेतीघाट हे लिलावास पात्र आहे. शासनस्तरावरून मंजुरी मिळताच लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.आठ जणांवर गुन्हे दाखलरेती तस्करी प्रकरणी मागील दोन वर्षामध्ये आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये २०१९ मध्ये ३ तर २०२० मध्ये ५ जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी नायब तहसीलदार राजू धांडे यांच्यावर काही तस्करांनी हल्ला करून धक्काबुक्की केली होती.रेती घाटांतून रेतीची चोरी करणाऱ्यांंवर कारवाईसाठी पथकांचे गठण करण्यात आले आहे. यामाध्यमातून रेती चोरीवर आळा घालण्यात येत आहे. यापुढेही ही कारवाई अधिकाधिक कडक करण्यात येणार आहे.- निलेश गौंडतहसीलदार, चंद्रपूर
दोन वर्षात १२६ रेती तस्कर वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 5:00 AM
मागील दोन वर्षामध्ये रेती तस्करीच्या १२६ वाहनांवर चंद्रपूर तहसील प्रशासनाने कारवाई केली असून १ कोटी २३ लाख ६५ हजार ८५५ रुपयांचा दंड वसुल केला आहे. यासाठी विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान, जप्त केलेल्या रेतीचा लिलाव करण्यात आला असून यातून १८ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या कारवाईलाही रेती तस्कर घाबरत नसल्यामुळे प्रशासनाने आता अधिकािधक कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देचंद्रपूर महसूल विभागाची कारवाई : १ कोटी २३ लाखांची शासनाच्या तिजोरीत भर, आठ जणांवर करण्यात आला गुन्हा दाखल