राजेश मंडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : आदिवासी व ग्रामीण भागात पावसाळ्यात जलजन्य आजार उद्भवू नये, याकरिता राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत दरवर्षी मे महिन्यात विभागनिहाय पाण्याचे नमुने तपासण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. मात्र, यंदा कोरोना लॉकडाऊनमुळे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेला जिल्ह्यातील १३ हजार ५५१ पाण्याच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यास अडसर निर्माण झाला. परिणामी, निष्कर्ष अहवालाअभावी ग्रामपंचायतींना जलजन्य आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे.जिल्ह्यात २०१९-२० मान्सूनकरिता १४ हजार ९७१ पाणी नमुने तपासणीचे उद्दिष्ट होते. यापैकी प्राप्त झालेल्या १३ हजार २०६ नमुन्यांची तपासणी झाली. २००२०-२१ मान्सूनपूर्व १४ हजार ९७१ नमुन्यांचे उद्दिष्ट मिळाले होते. लॉकडाऊनच्या काळातही १३ हजार ५५१ नमुने प्राप्त करण्यात चंद्रपूर भूजल सर्वेक्षण विभागाला यश आले. मात्र, या नमुन्यांचे विश्लेषण झाले नाही. ३० जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा जोमाने कार्यरत आहेत. राज्यातील पुणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागात दरवर्षी एकूण सार्वजनिक जलस्रोत, पाण्याचे नमुने आणि नमुने तपासणीचे उद्दिष्ट निश्चित होते. त्यासाठी राज्याचा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा सर्व जिल्ह्यातील पाणी तपासणी प्रयोग शाळांकडे जबाबदारी सोपवितो. सर्वेक्षणानुसार राज्यातील सहा विभागात २ लाख १२ हजार ६१४ सार्वजनिक जलस्रोतांची नोंद केली. यातील १ लाख ५० हजार १६ पाणी नमुन्यांची तपासणी झाली नाही. त्यामुळे भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे राज्य संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी सर्व जि. प. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांसाठी आदेश निर्गमित केले.नागपूर विभागात ३७ हजार नमुनेनागपूर विभागात ७१ हजार ७३ जलस्रोत असून ३६ हजार ५६६ पाण्याचे नमुने मे २०२० पर्यंत तपासणीचे नियोजन भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केले होते. त्यातील ३० हजार ४०० नमुने तपासण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र, लॉकडाऊन लागू झाल्याने ३७ हजार ७२ नमुन्यांची अद्याप तपासणीच होऊ शकली नाही. पाण्याचे नमुने तपासण्यात मागे पडलेल्या औरंगाबाद विभागानंतर नागपूर विभागाचा दुसरा क्रमांक आहे.का केली जाते पाण्याची तपासणी?भूजलक्षेत्रात काम करणारे नियोजक, धोरण आखणाऱ्या निमशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था व भूजल क्षेत्रात संशोधन व विकास साधणाºया यंत्रणांना पाण्याबाबत सर्वकष माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. अन्यथा भूजल विकासाशी निगडीत समस्यांना तोंड द्यावे लागते. पाणी नमुने तपासल्यानंतर ग्रामपंचायतस्तरावर उपाययोजना करण्यासाठी अहवाल उपयुक्त ठरतो. मात्र, कोरोनाचा कहर सुरू असल्याने नागपूर विभागात यंदा नमुने तपासणीचे काम पूर्ण होऊ शकले नाही.जलस्रोतांच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करणे अत्यावश्यक आहे. पावसाळ्यात विविध आजार होऊ नये, याकरिता सदर अहवालावरूनच विविध प्रतिबंधक उपाययोजना केल्या जातात. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील उर्वरित गावांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे काम विहित कालावधीतच पूर्ण होईल.-राहुल कर्डिले,मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर
१३ हजार ५५१ पाणी नमुने अद्याप तपासणीविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 5:00 AM
जिल्ह्यात २०१९-२० मान्सूनकरिता १४ हजार ९७१ पाणी नमुने तपासणीचे उद्दिष्ट होते. यापैकी प्राप्त झालेल्या १३ हजार २०६ नमुन्यांची तपासणी झाली. २००२०-२१ मान्सूनपूर्व १४ हजार ९७१ नमुन्यांचे उद्दिष्ट मिळाले होते. लॉकडाऊनच्या काळातही १३ हजार ५५१ नमुने प्राप्त करण्यात चंद्रपूर भूजल सर्वेक्षण विभागाला यश आले. मात्र, या नमुन्यांचे विश्लेषण झाले नाही. ३० जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा जोमाने कार्यरत आहेत.
ठळक मुद्देलॉकडाऊन इफेक्ट : पावसाळ्यात जलजन्य आजारांचा धोका