लोकमत न्यूज नेटवर्क
प्रवीण खिरटकरचंद्रपूर : मागील महिन्यात नाफेडने वरोरा बाजार समिती आवारात हमी भावाने तूर खरेदी सुरू केली. मात्र खरेदीची गती अतिशय संथ असल्याने आजपर्यंत केवळ २०० शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली आहे. तर नोंदणी केलेले १३०० शेतकरी तूर विक्रीसाठी वेटींगवर असून मोबाईल वरील संदेशाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे.शासनाने तूर पिकाकरीता हमी भाव ५४५० रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. मात्र व्यापारी हमी भावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करीत असल्याने तालुक्यातील १५१४ शेतकऱ्यांनी बाजार समिती वरोरामार्फत नाफेडकडे तूर विक्रीकरीता आॅनलाईन नोंदणी केली.नाफेडने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ८ फेब्रुवारीपासून तूर खरेदीला प्रारंभ केला. ८ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीमध्ये २०७ शेतकऱ्यांची २३ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मात्र अद्यापही नोंदणी केलेले १३०० शेतकरी घरात तूर साठवून ठेवली आहे. त्यामुळे शेतकरी दररोज तूर विक्रीचा मॅसेजची प्रतीक्षा करीत आहेत. तर काही शेतकरी बाजार समिती कार्यालयाची पायपीट करीत आहेत.मागील वर्षी शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली व शासनाने अचानक तूर खरेदी बंद केल्याने शेतकरी धास्तावले होते. त्यानंतर आ. बाळू धानोरकर यांनी आंदोलन केले. सदर आंदोलन राज्यात चांगलेच गाजले. त्यानंतर शासनाने तूर खरेदीला सुरूवात केली होती. त्यामुळे यावर्षीसुद्धा अशाच प्रकारे तूर खरेदी शासन बंद तर करणार नाही ना, अशा प्रश्नाने शेतकऱ्यांत भीती आहे.विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे चुकारे थकलेएक महिन्यापुर्वी दोनशे शेतकऱ्यांनी नाफेडला २३ हजार १३ क्विंटल तूर हमी भावाने विकली. परंतु, या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही रक्कम जमा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.चणा खरेदीचा मुहर्त सापडेनाअनेकांच्या शेतातील चणा निघाला असून शासनाने ४४०० रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला आहे. बाजारात भाव कमी असल्याने शेतकरी नाफेडच्या चणा खरेदीची वाट बघत आहेत. चणा खरेदी नोंदणीकरिता शेतकऱ्यांनी अर्ज बाजार समितीमार्फत नाफेडकडे सादर केले आहे. परंतु, आजतागत नाफेडला चणा खरेदीचा मुहूर्त सापडलेला नाही.