जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ५४ हजार ३६९ वर पोहोचली. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३७ हजार ७१५ झाली आहे. सध्या १५ हजार ८४३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ३ लाख ५९ हजार ५५४ नमुन्यांची तपासणी झाली. आतापर्यंत ८११ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ७४७, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २७, यवतमाळ २५, भंडारा सहा, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोना संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
असे आहेत मृतक
आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपुरातील श्यामनगर परिसरातील ५८ वर्षीय पुरुष, श्रीराम वाॅर्डातील ४७ वर्षीय पुरुष, इंदिरानगरातील ६५ वर्षीय महिला व ६७, ५० वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील ५८, ७० व ७२ वर्षीय पुरुष, बल्लारपूर बामणी येथील ४५ वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील चुनाभट्टी वाॅर्ड येथील ४१ वर्षीय पुरुष, चुनाळा येथील ६५ वर्षीय पुरुष, चिमूर-बोथली येथील ३७ वर्षीय महिला, खडसंगी येथील ७० वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील ६३ वर्षीय पुरुष व ४७ वर्षीय महिला, गोंडपिपरीतील ६७ वर्षीय महिला व ५१ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील भवानी वाॅर्ड येथील ६२ वर्षीय पुरुष, देलनवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष, गडचांदूर येथील ४० वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी येथील ५८ वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष, गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील ७४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह
चंद्रपूर मनपा क्षेत्र ६२१
चंद्रपूर तालुका ६१
बल्लारपूर ६०
भद्रावती १३८
ब्रह्मपुरी ११२
नागभीड २७
सिंदेवाही ३८
मूल ७३
सावली २०
पोंभुर्णा ११
गोंडपिपरी ४३
राजुरा ३१
चिमूर ७३
वरोरा १२०
कोरपना ५९
जिवती २१
इतर २१