जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ७३ हजार ३१४ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ५९ हजार ९७६ झाली आहे. सध्या १२ हजार २१२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ४ लाख १८ हजार ९५ नमुन्यांची तपासणी करण्यात आंली. त्यापैकी ३ लाख ४० हजार ५३१ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ११२६ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १०३९, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ३५, यवतमाळ ३५, भंडारा १०, वर्धा १, गोंदिया २ आणि नागपूर येथील २ बाधितांचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी त्रिसूत्रीचे नियमित पालन करावे, स्वत:ची काळजी घ्यावी व कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
असे आहेत मृत
आज मृत झालेल्यांमध्ये चिमूर तालुक्यातील किटाळी मक्ता येथील ४४ वर्षीय पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील ५७ वर्षीय महिला, सिंदेवाही तालुक्यातील ८१ वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील ४५ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, बल्लारपूर तालुक्यातील आसेगाव येथील ४६ वर्षीय पुरुष, बाळापूर तळोधी येथील ५१ वर्षीय पुरुष व पाथरी येथील ३५ वर्षीय महिला, तर वणी-यवतमाळ येथील ६४ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.
तालुकानिहाय बाधित
चंद्रपूर मनपा क्षेत्र २९४
चंद्रपूर तालुका ९४
बल्लारपूर ६२
भद्रावती २४
ब्रह्मपुरी ०९
नागभीड १६
सिंदेवाही १७
मूल १४
सावली ०७
पोंभूर्णा ४७
गोंडपिपरी ५२
राजूरा ५२
चिमूर ०८
वरोरा ९५
कोरपना ९६
जिवती ०१
अन्य ०७