सध्या अनेक डावपेच आखणे सुरू असून, त्यातील एक डावपेच म्हणजे प्रतिस्पर्धी गटातील उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावणे. यासाठी विविध आमिषे दाखवली जात असून, दबावतंत्र वापरले जात आहे. प्रत्येकाला या निवडणुकीत आपली अस्मिता दाखविण्याची संधी असते. त्यामुळेच ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.
कोरोनाच्या दहशतीतसुद्धा उमेदवारांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात कमालीचा उत्साह दिसून आहे. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीत थेट लढत, तर काही ठिकाणी तिहेरी लढतीची शक्यता आहे. ब्रह्मपुरी तालुक्यामधील बोढेगाव ग्रामपंचायतीमध्ये १०, खरकाडा २१, रणमोचन १४, बेटाळा १८, किन्ही ९, जुगणाळा १८, कोसंबी (खड) १३, वांद्रा १५, बोडधा १३, आवळगाव ३२, आकसापूर १३, कालेता १८, चांदली १४, लाखापूर १६, खंडाळा १९, खेडमक्ता ३४, बेलगाव २६, तोरगाव (बु) २०, कोलारी २०, तोरगाव (खु) २०, चौगान ३०, रानबोथली १८, चकबोथली १६, निलज १०, पाचगाव ९, रुई २३, मेंडकी २५, रामपुरी २०, तुलानमेंढा १६, चोरटी १६, वायगाव १६, अऱ्हेर - नवरगाव ३२, भालेश्वर १३, दिघोरी २९, नान्होरी २९, लाडज १५, सुरबोडी १०, सोंद्री १२, चिखलगाव २३, हरदोली १३, चीचगाव १३, गोगाव १८, गांगलवाडी २०, तळोधी खुर्द १९, बरडकिन्ही २१, अड्याळ-जाणी २४, चांदगाव १७, नांदगाव जाणी २३, कोथुळणा २१, कन्हाळगाव १२, मुडझा २४, एकारा १८, बल्लारपूर (माल) १७, कुडेसावली १३, हळदा २६, सायगाव २३, मांगली १६, भूज १७, कळमगाव १४, जवराबोडीमेंढा १९, मुई ११, सोनेगाव १६, सावलगाव १५, चिंचोली १६, पिंपळगाव २८, बोरगाव १४, झीलबोडी १३, उदापूर २१, मालडोंगरी २८, पारडगाव २५, याप्रमाणे शेवटच्या दिवसापर्यंत १,३५९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
तालुक्यातील किन्ही, निलज, सुरबोडी या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अंतिम चित्र स्पष्ट होईल.