लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्थानिक हनुमान खिडकीबाहेरील तुळजा भवानी मंदिर परिसरा मधून वाहणाऱ्या झरपट नदीच्या पात्रात मासे पकडण्याच्या जाळीने एक इसम पक्षी पकडत असल्याची इको-प्रोला माहिती मिळाली. इको-प्रोच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत पक्ष्यांच्या शिकारीवर तत्काळ आळा घातला. त्यामुळे काही पक्ष्यांचे प्राण वाचले. मात्र यात १४ पक्ष्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार रविवारी घडला.सदर पक्षी पाण्यावरचे किडे खाण्यासाठी घिरटया घालत असताना एक व्यक्ती जाळीने पक्षी पकडत होता. यावेळी इको-प्रोच्या सदस्यांनी तिथे जावून पक्षी पकडने थांबविले. चार-पाच पक्षी जीवंत असल्याने त्यांना त्वरित सोडण्यात आले. मात्र उर्वरित १४ पक्षी मृत होते, त्यांच्या माना तोडल्या होत्या, दोन पक्षी जखमी अवस्थेत होते. इको-प्रो सदस्य त्वरित पोहचल्याने अनेक पक्षी जाळ्यात अडकण्यापासून वाचले. सदर ठिकाणी परत अशी शिकार केली जाणार नाही, याबाबत जनजागृती करण्यात आली.इको-प्रो पक्षी व वन्यजीव विभागाचे सदस्य अमोल उटटलवार, सुमित कोहले, सचिन धोतरे, अभय अमृतकर, आशीष मस्के यांनी घटनास्थळी पोहचून हा प्रकार थांबविला.याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांना देण्यात आली. जीवंत पक्षी मुक्त करण्यात आले. त्यानंतर याची माहिती वनविभागाला देत मृत व जखमी पक्षी वनविभागाच्या तात्पुरता निवारा केंद्रात नेण्यात आले. याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे व वनपाल भूषण गजपुरे यांना देण्यात आली. याप्रकरणात अद्याप सदर व्यक्तीला ताब्यात घेतले नाही.पाखराची काडीछोट्या चिमण्यासारखे दिसणारे 'लालबुड्या भांडिक’ या पक्ष्याची स्थानिक शिकारी शिकार करून बाजारात 'पाखराची काडी' म्हणून विकतात. या पक्ष्याचे पंख आणि पिसे काढून एका काडीला पाच-पाच रोऊन ही विक्री केली जाते. बाजारात मागणी असल्याने या दिवसात या पक्ष्याची शिकार केली जाते. नागरिक आणि अशी शिकार करणारे व्यक्तींमध्ये जनजागृतीची गरज आहे.
चंद्रपुरात १४ पक्ष्यांची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:51 PM
स्थानिक हनुमान खिडकीबाहेरील तुळजा भवानी मंदिर परिसरा मधून वाहणाऱ्या झरपट नदीच्या पात्रात मासे पकडण्याच्या जाळीने एक इसम पक्षी पकडत असल्याची इको-प्रोला माहिती मिळाली. इको-प्रोच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत पक्ष्यांच्या शिकारीवर तत्काळ आळा घातला. त्यामुळे काही पक्ष्यांचे प्राण वाचले. मात्र यात १४ पक्ष्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार रविवारी घडला.
ठळक मुद्देसाहित्य वनविभागाच्या ताब्यात : सतर्कतेमुळे अन्य पक्ष्यांचे जीव वाचले