चंद्रपूर : राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण-२०२० जाहीर केले आहे. या अंतर्गत धोरणाचे फायदे जास्तीत जास्त कृषी ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी १ माार्च ते १४ एप्रिल २०२१ पर्यंत जनजागृती अभियान राबविणे सुरू आहे. कृषी ऊर्जापर्व अंतर्गत चंद्रपूर परिमंडळातील तब्बल १४ हजार ७११ कृषीपंपधारकांनी आपल्याकडील थकबाकी भरून थकबाकीमुक्त झाले असून आतापर्यंत ९ कोटी ४९ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. कोरोनाकाळ तसेच वीज बिल भरण्यात अस्थिरता असतानाही महावितरण चंद्रपूर परिमंडळाने वसुलीत यश मिळविले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ३०८ महिला कृषीपंपधारक आहे.
राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० जाहीर केले आहे. या धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. या धोरणाचे फायदे जास्तीत जास्त कृषी ग्राहकांपर्यंत पोहोचविल्या जात आहे. १० मार्च२०२१ पर्यंत एकूण १४ हजार ७११ कृषी पंपधारकांनी ९ कोटी ४९ लाखांचा भरणा केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील १० हजार ५२७ कृषी ग्राहकांनी ६ कोटी ९६ लाख तर गडचिरोली जिल्ह्यातील ४ हजार १८४ कृषी ग्राहकांनी २ कोटी ५३ लाखांचा भरणा केला आहे. थकबाकीमुक्त झालेल्या कृषी पंपधारकांपैकी एकंदरीत ३ हजार ५६१ कृषीपंपधारकांना थकबाकीमुक्त झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. त्यात ३०८ महिलांचा समावेश आहे. महिला दिनाचे औचित्य साधून थकबाकीमुक्त झालेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला असून त्यांना थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
कोट
ग्रामसभा, मेळावे तसेच कृषी धोरणांविषयी अधिकाधिक ग्राहकांपर्यंत माहिती पोहोचविली जात आहे. कृषी पंपधारकांना कृषी ऊर्जापर्वाबद्दल होणाऱ्या लाभाबद्दल माहिती दिली जात आहे. त्यामुळे ग्राहक आता वीज भरून थकबाकीमुक्त होत आहेत. अधिकाधिक वीजग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा.
-सुनील देशपांडे
मुख्य अभियंता, महावितरण
बाॅक्स
कृषी ऊर्जा पर्वाअंतर्गत ४६१ ग्रामसभा घेण्यात आल्या. ४११ कृषी मेळावे, १४ सायकल रॅली, २३२ बांधांवर ‘महावितरण’चे अधिकाऱ्यांनी जावून-कॅपॅसिटरचा वापरामुळे कृषी पंपांना योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळणे, कृषीपंप हाताळतांना घेण्यात येणारी खबरदारी, वीज सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले. कृषी पंपधारकांना कृषी ऊर्जापर्वाबद्दल होणाऱ्या लाभाबद्दल माहिती दिली जात आहे.