लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील बिएसआर ठेकेदारी कामगारांना पूर्ववत काम द्यावे. अन्यथा काम न दिल्यास कमीत कमी १५ दिवसांचा पगार द्यावा व जून महिन्याचा झालेला पगारसुद्धा कमीत कमी १५ दिवसाचा द्यावा. जोपर्यंत परिस्तिथी सुरळीत होणार नाही, तोपर्यंत हा निर्णय लागू राहील,असा करार कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटनांमध्ये झाला आहे. यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट ही कंपनी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे २४ मार्चपासून पूर्णता बंद होती. शासकीय परवानगीनंतर कंपनीचे काम एक महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने सुरू होऊन १ जूनपासून कंपनी नियमित सुरू झाली. लॉकडाऊन काळातील ३१ मेपर्यंतच्या पगाराबद्दल युनियनने मध्यस्थी करून सन २०१९ च्या एप्रिल व मे महिन्याच्या पगाराचा अॅव्हरेज काढून सर्वच ठेकीदारी कामगारांना एप्रिल व मे २०२० महिन्याचा पगार देण्यात आला. जून महिन्यात कंपनीचे काम सुरु झाले. परंतु कामावरील बीएसआर ठेकेदारी कामगारांना सुरळीत काम न मिळाल्यामुळे व कंपनीने प्रत्येक्ष हजेरीचाच पगार दिल्यामुळे बऱ्याच कामगारांना २-४ दिवसांच्या अल्प पगारात जीवन जगण्याची वेळ आली.या अडचणीला प्रथम प्राधान्य देऊन अल्ट्राटेक सिमेंट आवारपूरच्या व्यवस्थापनासोबत येथील कार्यरत अल्ट्राटेक सिमेंट कामगार संघाने दोन वेळ प्रदीर्घ चर्चा करून युनियनचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात व मध्यस्तीने एक करार केला.बीएसआर ठेकेदारी कामगारांना पूर्ववत काम द्यावे. अन्यथा काम न दिल्यास कमीत कमी १५ दिवसांचा पगार द्यावा व जून महिन्याचा झालेला पगारसुद्धा कमीतकमी १५ दिवसांचा द्यावा, असे या करारात नमूद आहे.बीएसआर ठेकेदारी कामगारांना जास्तीत जास्त हजेरी मिळावी, याकरिता सप्लाय कामगारातील निवृत्त किंवा रिक्त झालेल्या जागेवर बीएसआर कामगारांना सामावून घेण्याबद्दल दीर्घ चर्चा करून पुढे मार्ग काढण्याचे मंजूर झाले आहे. या चर्चेदरम्यान कंपनीकडून युनिट हेड विजय एकरे, अनिल पिल्लई, पाठक तसेच कामगार संघाकडून कर्याध्यक्ष शिवचंद्र काळे, नंदकिशोर बिलारिया, एम.एस. चंदेल, नरेंद्र पांडे, गजानन बोढेकर आदी उपस्थित होते.कामगार संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर येथे जो करार करण्यात आला, अशा पद्धतीचा करार आतापर्यंत अल्ट्राटेकच्या कोणत्याही सिमेंट कंपनीत झाला नाही. ही आमच्या कामगार संघटनेसाठी अभिमानाची बाब आहे.- शिवचंद्र काळे कार्याध्यक्ष, अल्ट्राटेक सिमेंट कामगार संघ
काम न दिल्यास १५ दिवसाचा पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 5:00 AM
आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट ही कंपनी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे २४ मार्चपासून पूर्णता बंद होती. शासकीय परवानगीनंतर कंपनीचे काम एक महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने सुरू होऊन १ जूनपासून कंपनी नियमित सुरू झाली. लॉकडाऊन काळातील ३१ मेपर्यंतच्या पगाराबद्दल युनियनने मध्यस्थी करून सन २०१९ च्या एप्रिल व मे महिन्याच्या पगाराचा अॅव्हरेज काढून सर्वच ठेकीदारी कामगारांना एप्रिल व मे २०२० महिन्याचा पगार देण्यात आला.
ठळक मुद्देअल्ट्राटेक कंपनीतील करार : ठेकेदारी कामगारांना मोठा दिलासा