लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर वरोरा व सिंदेवाही येथे कारवाई करुन १५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.वरोरा शहरातील कचरा डंपींग ग्राऊंडमध्ये दोन युवकांनी अवैध दारुसाठा लपवून ठेवल्याच्या माहितीवरुन पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली. या कारवाईत दोन दुचाकीसह, देशी दारूच्या १६९० बॉटल दारु असा एकूण दोन लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर दुसऱ्या कारवाईत सिंदेवाही येथे नागपूरवरुन नागभीडमार्गे चारचाकी पिकअप गाडीने देशी दारुची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरुन नाकाबंदी करुन चारचाकी वाहन क्रमांक एम. एच ४९ डी. ५०३३ या गाडीची तपासणी केली. यावेळी गाडीची झडती घेतली असता गाडीच्या मागील बाजूस कुटाराने भरलेले बोरे आढळून आले. तर पुढील बाजूस कप्पा तयार करुन त्यामध्ये देशी दारुने भरलेल्या नऊ लाख ८० हजार रुपयांचा दारुच्या पेट्या आढळून आल्या. या कारवाईत पोलिसांनी चारचाकी वाहन, दोन मोबाईल फोन असा एकूण १२ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र वैरागडे, पोलीस उप निरिक्षक मुटेकर, पोहवा विजय संगीडवार, अमजद खान, संदीप मुळे, मयूर येरणे, प्रितम रामटेके आदींनी केली.
१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 12:20 AM
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर वरोरा व सिंदेवाही येथे कारवाई करुन १५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देदोन ठिकाणी धाड : गुन्हे शाखेची कारवाई