लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत सिंदेवाही येथे विभागीय कृषी संशोधन केंद्र गेल्या अनेक दशकापासून सुरू आहे. या कृषी संशोधन केंद्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी सभागृह, कार्यालयीन इमारत, अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, कृषीवर आधारीत प्रयोगशाळा, माती परीक्षण केंद्रासह अनेक इमारती असून या इमारती जीर्ण अवस्थेत आल्या होत्या. याची दखल घेत विधीमंडळ उपगटनेता तथा आ. विजय वडेट्टीवार यांच्या पाठपुराव्याने इमारत बांधकामांसाठी १५ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे.कृषी संशोधन केंद्रातील विविध इमारती जीर्ण झाल्याने केव्हाही जिवितहानी होवू शकतो, अशी तक्रार शेतकºयांनी जून २०१७ मध्ये आ. विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली होती.त्यामुळे आ. वडेट्टीवार यांनी विभागीय कृषी संशोधन केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सर्व इमारती धोकादायक स्थितीत आढळून आल्याने एक वर्षाच्या आत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. २०१७ च्या पावसाळी अधिवेशनात आणि हिवाळी अधिवेशनात कपात सूचनेच्या माध्यमातून आ. वडेट्टीवार यांनी शासनाचे लक्ष वेधले होते.त्यामुळे सिंदेवाही येथील विभागीय कृषी केंद्राचे बळकटीकरण करण्यात येणाºया बांधकामासाठी १५ कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास महाराष्ट्र शासन कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने १६ जुलै २०१८ च्या आदेशान्वये प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यातच कामाला सुरूवात होणार आहे. आ. विजय वडेट्टीवार यांच्या पाठपुराव्याने हा निधी मंजूर झाला आहे.संशोधन केंद्रात अशी होणार कामेमंजूर झालेल्या १५ कोटींच्या निधीमध्ये २०० प्रशिक्षणार्थी सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी ९४ लक्ष ३७ हजार ७५ रुपये, चैन लिंक कुपन व कार्यालयीन परिसरात भिंत बांधण्यासाठी १ कोटी ५० हजार रूपये, रस्ते बांधकामासाठी २ कोटी ३९ लक्ष ६१ हजार ५९७ रूपये, खळे, कार्यालय बांधकामासाठी ५५ लक्ष ४३ हजार १२७ रूपये, गुरे व शेळ्यांकरिता गोठ्यांचे बांधकामासाठी ४० लक्ष ९५ हजार रूपये, कार्यालयीन इमारत बांधकामासाठी ९२ लक्ष ३८ हजार ५५७ रुपये, धान्य साठवणूक आणि खते साठविण्याकरीता गोदामासाठी ५६ लक्ष ७० हजार रुपये, प्रयोगशाळेचे बांधकामासाठी ३ कोटी ६९ लक्ष ५४ हजार २२५ रूपये, प्रयोगशाळेतील उपकरणांसाठी ६१ लक्ष ९० हजार २६७ रूपये, अवजारे आणि यंत्रांसाठी ४१ लक्ष ५९ हजार ९९० रुपये, विस्तार कार्यासाठी लागणाºया सामुग्रीसाठी ४५ लक्ष ७० हजार रुपये, तांत्रिकीकरणासाठी २ कोटी रूपये याप्रमाणे १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सिंदेवाहीच्या कृषी संशोधन केंद्रासाठी १५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:51 PM
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत सिंदेवाही येथे विभागीय कृषी संशोधन केंद्र गेल्या अनेक दशकापासून सुरू आहे. या कृषी संशोधन केंद्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी सभागृह, कार्यालयीन इमारत, अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, कृषीवर आधारीत प्रयोगशाळा, माती परीक्षण केंद्रासह अनेक इमारती असून या इमारती जीर्ण अवस्थेत आल्या होत्या.
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांचा पाठपुरावा : विविध इमारतींचे बांधकाम, समस्या दूर होणार