बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय : अवघड व सोयीचे क्षेत्र अशी होणार विभागणीचंद्रपूर : जिल्हा परिषदेतील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. शिक्षकांच्या बदलीचे नवीन धोरण ग्रामविकास मंत्रालयाच्या सचिवांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत ठरविण्यात आले आहे. अवघड व सोयीचे क्षेत्र अशी विभागणी करून हे धोरण ठरविण्यात आले आहे. यामुळे शिक्षकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या जिल्हातंर्गत बदली धोरण हे शिक्षक संघटनांना विश्वासात घेतल्याशिवाय निश्चित केले जाऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने सातत्याने पाठपुरावा केला होता.अखेर महाराष्ट्र शासनाने ६ जानेवारी २०१७ रोजी शिक्षक संघटनाच्या बैठकीत शिक्षकांचे बदली धोरण निश्चित केले आहे.ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव यांच्या उपस्थितीत सदर बैठक पार पडली. यात तालुका व जिल्ह्याचे अवघड क्षेत्र व सोयीचे क्षेत्र अशी विभागणी करून बदल्या करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. हे विभाग पाडण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असणार आहे. त्यासाठी अवघड क्षेत्र व सोयीच्या क्षेत्रातील रिक्त जागा दोन महिने अगोदर मुख्य कार्यपालन अधिकारी आॅनलाईन जाहीर करतील. अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांची सेवा बदलीसाठी तीन वर्षे धरण्यात येईल. त्यांनी जिल्ह्यातील कोणतीही १५ रिक्त शाळांची मागणी करायची. त्यापैकी एका शाळेत १०० टक्के बदलीची हमी देण्यात आली आहे. सोयीच्या ठिकाणी दहा वर्षे सेवा झालेले शिक्षक बदलीपात्र असणार आहेत. त्यासाठी त्यांनी बदलीसाठी २५ अवघड क्षेत्रातील गावांची मागणी करायची आहे. बदलीसाठी आता तालुका व जिल्हास्तर राहणार नाही. बदलीमध्ये दुर्गम भागातील गाव मागणार नाहीत. त्या ठिकाणी पात्र मधून जेष्ठतेने बदली होणार. सर्व बदल्या मे महिन्यामध्ये होणार असल्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले. शिवाय पदोन्नतीसुद्धा वर्षातून एकदाच होणार आहे. बदलीमध्ये पूर्वीप्रमाणे अपंग, मतीमंद मुलाचे पालक, विधवा यांच्यासाठी सवलत देण्यात येणार आहे. तसेच आंतरजिल्हा बदल्या झाल्याशिवाय शिक्षक पदे भरल्या जाणार नाहीत. महत्वाचे म्हणजे, या सर्व बदल्या संगणकावर आॅनस्क्रीन होणार असल्याने कुणाचाही हस्तक्षेप चालणार नाही.या बैठकीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वावरे, राज्यसरचिटणीस केशवराव जाधव, राज्य सल्लागार मधुकर काठोळे, तुकाराम कदम आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बदली धोरण निश्चितीमुळे जिल्हा संघाचे नेते जी.जी. धोटे, जिल्हाध्यक्ष जे.डी. पोटे, सरचिटणीस किशोर उरकुडवार, कार्याध्यक्ष सुभाष बेले, शिक्षण समिती सचिव संतोष कुंटावार व जिल्ह्यातील शिक्षकांनी दिलासा व्यक्त केला आहे. (शहर प्रतिनिधी)पती-पत्नी एकत्रीकरणाला प्राधान्यआंतर जिल्हा बदलीसाठी पूर्वीचे प्रस्ताव लवकरच मान्य करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य रोस्टर लागू करण्यात येईल. बदल्यांच्या धोरणात पती-पत्नी एकत्रीकरणाससुद्धा प्राधान्य देण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे. दोघात ३० किमी पेक्षा अधिक अंतर असणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे.
शिक्षकांना बदलीसाठी मिळणार १५ ऐच्छिक जागा
By admin | Published: January 08, 2017 12:42 AM