शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

मुरूम खननप्रकरणी तहसीलदारांकडून रेल्वे प्रशासनाला १.५१ कोटीची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 2:58 PM

Chandrapur : अवैध उत्खनन, तपासणी करण्याचे निर्देश मात्र आठवडा उलटूनही कार्यवाही नाही

लोकमत न्यूज नेटवर्क वरोरा : तालुक्यातील डोंगरगाव रेल्वे परिसरात अवैध उत्खनन केल्याचा ठपका ठेऊन तहसीलदाराने रेल्वे अधिकाऱ्यांना १.५१ कोटी रुपयांची दंडात्मक नोटीस बजावली. अवैध उत्खननाबाबत कारवाई का करण्यात येऊ नये, असा उल्लेख नोटीसमध्ये नमूद आहे. त्यामुळे याप्रकरणाबाबत रेल्वे प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

रेल्वे प्रशासनाकडून डोंगरगाव परिसरात उत्खनन करण्यात आले. याबाबत वरोरा उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदारांना तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आठवडा उलटूनही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे छोटू शेख व गावकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सर्व्हे क्रमांक २४ डोंगरगाव रेल्वे डहाळा रिठ परिसरातील महसूल जमिनीवर अवैध उत्खनन चालू असल्याचे निदर्शनास आणले. त्यानंतर नायब तहसीलदार उल्हास लोखंडे व तलाठी कवड्डू आत्राम यांना तातडीने कळविण्यात आले. 

नायब तहसीलदारांनी लगेच घटनास्थळी येऊन रेल्वे अधिकारी व कंत्राटदारांना जमिनीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली. दरम्यान, रेल्वेचे अधिकारी सिद्धार्थ गुप्ता यांनी उत्खननाचे अधिकार असल्याचा दावा केला. वाहन जप्त करू नये अन्यथा प्रधानमंत्री कार्यालयात तक्रार करू असाही असा इशारा दिला. शिवाय, पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्यामुळे नायब तहसीलदार व तलाठ्यांनी पंचनामा करून छायाचित्रों घेतली आणि तसा अहवाल तहसीलदार कार्यालयात सादर केला. त्यानंतर तहसीलदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली. 

काय आहे नोटीसमध्ये ? तहसीलदारांनी रेल्वेला बजावलेल्या नोटिसीमध्ये गट क्रमांक २४ सरकारी जमीनमध्ये मुरूम गौण खनिजाचे अवैध उत्खनन झाल्याचे नमूद आहे. घटनास्थळी १४२५ ब्रास मुरूम उत्खनन झाल्याचे आढळले. प्रति ब्रास २ हजार रुपये दराने एकूण १ कोटी ४२ लाख ५० हजार रुपये दंड आणि स्वामीत्वधन म्हणून प्रति ब्रास ६०० रुपये दराने ८ लाख ५५ हजार रुपये असा एकूण १ कोटी ५१ लाख ५ हजार रुपयांचा दंड का आकारला जाऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली.

टॅग्स :Mining Scamखाण घोटाळाrailwayरेल्वेchandrapur-acचंद्रपूर