आर्थिक व दुर्बल घटकातील बालकांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार नामांकित शाळेमध्ये २५ टक्के बालकांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे. २०२१-२०२२ या सत्रासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी मागील आठवड्यापर्यंत शाळांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार जिल्ह्यातील १९६ शाळेतील १५७६ जागेसाठी २१ मार्चपर्यंत आरटीई पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
बॉक्स
एकाच टप्प्यात निघणार लॉटरी
नव्या शैक्षणिक सत्राकरिता आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी तीन टप्प्याऐवजी एकाच टप्प्यात लॉटरी काढली जाईल. तसेच शाळेत आरटीईअंतर्गत उपलब्ध जागांएवढी एक प्रतीक्षायादी तयार केली जाईल. लॉटरीतील निवड झालेल्या मुलांनी वेळेवर प्रवेश घेतला नाही तर वेटिंग लिस्टमधील मुलांना प्रवेशाची संधी देण्यात येणार आहे.
बॉक्स
मागील वर्षी जागा रिक्त
सन २००९ पासून बालकांना मोफत प्रवेश दिल्या जात आहे. यासाठी हजारो पालक आपल्या पाल्यांचा अर्ज सादर करतात. मात्र शाळा विविध अटी लादत असल्यामुळे अनेकांचा प्रवेश होत नाही. तर अनेक शाळा प्रवेश निश्चित होऊन बालकाला शाळेत प्रवेश देत नाही. त्यामुळे दरवर्षी अनेक पदे रिक्त राहतात. परिणामी शासनाच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. अशा शाळांवर कारवाई करणे, गरजेचे आहे.